Join us  

और ये लगा छक्का... धोनीचा गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून वर्ल्डकपची आठवण

आयपीएलच्या 14 व्या सिझनला 9 एप्रिलपासून (IPL 2021) सुरुवात होणार आहे. यंदाचे आयपीएल सामने भारतात रंगणार आहेत. त्यामुळे, गतवर्षी निराश झालेल्या चाहत्यांना पुन्हा एकदा आयपीएलचा आनंद घेता येणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 9:22 AM

Open in App
ठळक मुद्देधोनीचा हेलिकॉप्टर शॉट चाहत्यांचा सर्वात आवडता षटकार असतो. त्यामुळे, धोनीचा षटकार पाहण्यासाठी रिप्लाय आणि सोशल मीडियावरही चाहते उत्सुक असतात

नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची फलंदाजी म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. धोनीने टीम इंडियाने गमावेलल्या कित्येक सामन्यात संघाला विजय मिळवून दिलाय. आपल्या हटकेस्टाईल आणि आक्रमक खेळीमुळे तो कोट्यवधी चाहत्यांचा हिरो बनलाय. त्यामुळेच, धोनीचा प्रत्येक शॉट चाहत्यांना परत परत पहावा वाटतो. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत धोनीने लगावलेला विश्वविजयी षटकार भारतीयांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. त्यामुळेच, धोनीचे षटकार हे लक्षवेधी असतात. सध्या, आयपीएलच्या सरावतही धोनीने असाच उत्तुंग षटकार ठोकला आहे. 

आयपीएलच्या 14 व्या सिझनला 9 एप्रिलपासून (IPL 2021) सुरुवात होणार आहे. यंदाचे आयपीएल सामने भारतात रंगणार आहेत. त्यामुळे, गतवर्षी निराश झालेल्या चाहत्यांना पुन्हा एकदा आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. या पर्वासाठी प्रत्येक संघाने आपल्या परीने सराव सुरु केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार ‘कॅप्टन कुल’ अर्थात महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) नेट्समध्ये जोरदार सराव करत आहे. या सरावादरम्यान धोनीने तब्बल 114 मीटर लांब गगनचुंबी षटकार खेचला आहे. याचा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्जसच्या ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे. (Chennai Super Kings Captain Mahendra Singh Dhoni hit a six of 114 meters)

धोनीचा हेलिकॉप्टर शॉट चाहत्यांचा सर्वात आवडता षटकार असतो. त्यामुळे, धोनीचा षटकार पाहण्यासाठी रिप्लाय आणि सोशल मीडियावरही चाहते उत्सुक असतात. त्यासाठीच, चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या चाहत्यांसाठी त्याने ठोकलेला षटकार व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. नेट प्रॅक्टीसमध्ये धोनी खेळताना दिसत असून उत्तुंग षटकार धोनीने मारला आहे. 10 सेकंदाच्या या व्हिडिओला क्रिकेट चाहत्यांचे चांगलेच लाईक मिळत आहेत. तसेच, माहीच्या चेन्नई सुपर किंग्जला आपला सपोर्ट असल्याचंही नेटीझन्स सोशल मीडियातून सांगत आहेत.  दरम्यान, आयपीएलचा 13 वा सिझन चेन्नईसाठी खराब ठरला. मात्र धोनीने चेन्नईला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. धोनी आयपीएलमध्ये रोहित शर्मानंतरचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. तसेच धोनी आयपीएलमध्ये यशस्वी फलंदाज राहिला आहे. 

टॅग्स :आयपीएलमहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स