Join us  

Asia Cup 2018: डावखुऱ्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारताने मागवला श्रीलंकेतून 'स्पेशालिस्ट'

Asia Cup 2018: आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या मदतीला एक अतिरिक्त हात आला आहे. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या डावखुऱ्या गोलंदाजांच्या माऱ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी भारतीय संघाने श्रीलंकेहून स्पेशालिस्ट मागवला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 9:06 AM

Open in App

दुबई, आशिया चषक २०१८ : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या मदतीला एक अतिरिक्त हात आला आहे. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या डावखुऱ्या गोलंदाजांच्या माऱ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी भारतीय संघाने श्रीलंकेहून स्पेशालिस्ट मागवला आहे. नुवान सेमेविरत्ने असे त्याचे नाव असून तो डाव्या हाताने चेंडू टाकून भारतीय फलंदाजांचा सराव करून घेणार आहे. नुवानने दोन प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. 

( Asia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीतही भारतच जेतेपदाचा प्रबळ दावेदार, 'दादा'चे भविष्य )

या स्पर्धेत भारतीय फलंदाजांना बऱ्याच डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नुवानला पाचारण करण्यात आले. भारताकडे राघविंद्र नावाचा एक स्पेशालिस्ट आहे. उसळत्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा कसा सामना करायचा याचा सराव राघविंद्र करून घेतो. भारतीय संघात २० वर्षीय डावखुरा गोलंदाज खलील अहमद याच समावेश केलेला आहे. पण त्याचा दीर्घ काळासाठी अद्याप विचार न झाल्याने नुवानची नियुक्ती करण्यात आली. 

( Asia Cup 2018: आजपासून आशिया चषकाचा महासंग्राम )

गतवर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मोहम्मद आमीर आणि जुनेद खान यांनी भारतीय फलंदाजांना अपयशी केले होते. आमीरने भारताच्या रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या आघाडीच्या फलंदाजांना माघारी पाठवले होते. जुनेदने रवींद्र जडेजाला बाद केले होते. भारताला तो सामना १८० धावांनी गमवावा लागला होता. 

पाकिस्तानच्या संघात चार डावखुरे जलदगती गोलंदाज आहेत. आमीर, जुनेद, उस्मान खानंद आणि शाहेन आफ्रीदी; बांगलादेशकडे अबू हिदर आणि मुस्ताफिजूर रहमान हे दोन, तर अफगाणिस्तानकडे सयद शिर्जाद हा डावखुरा गोलंदाज आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठेही नुवान भारतीय फलंदाजांना मदत करणार आहे.  

टॅग्स :आशिया चषकरोहित शर्माबीसीसीआय