Join us  

Asia Cup 2018 : महेंद्रसिंग धोनीला विक्रम रचण्याची संधी

या स्पर्धेत धोनीकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. या संघात सर्वात अनुभवी खेळाडू हा धोनीच आहे. धोनीने आतापर्यंत आशिया चषकात 13 सामने खेळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 1:38 PM

Open in App
ठळक मुद्दे12 डावात फलंदाजी करताना धोनीने तब्बल 95.16च्या सरासरीने 571 धावा केल्या आहेत

मुंबई, आशिया चषक 2018 : काही तासांवर आशियाच चषक क्रिकेट स्पर्धा येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला काही विक्रण रचण्याची संधी आहे.

या स्पर्धेत भारतीय संघ हाँगकाँग आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्याबरोबर साखळी सामने खेळणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली खेळणार नसल्याने रोहित शर्माकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

या स्पर्धेत धोनीकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. या संघात सर्वात अनुभवी खेळाडू हा धोनीच आहे. धोनीने आतापर्यंत आशिया चषकात 13 सामने खेळले आहेत, यापैकी 12 सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केली आहे. 12 डावात फलंदाजी करताना धोनीने तब्बल 95.16च्या सरासरीने 571 धावा केल्या आहेत, यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. या 12 डावांमध्ये धोनी सहा वेळा नाबाद राहीलेला आहे.

आशियाच चषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी सध्या चौथ्या स्थानावर आहे. या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे विराट कोहली (613) आणि गौतम गंभीर (573) आहेत. पण धोनीने या स्पर्धेत अर्धशतक जरी झळकावले तर तो या दोघांना मागे टाकू टाकतो. आशिया चषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या खात्यात 971 धावा आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीआशिया चषकसचिन तेंडुलकरविराट कोहली