दुबई : आयसीसी कसोटी मानांकनात ९०० गुणांचा आकडा पार करीत दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. भारतीय आॅफस्पिनर आर. आश्विन याने दोन स्थानाने प्रगती केली आहे.
रबाडाने १५० धावा देत ११ बळी घेतले होते. त्याच्या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाचा ६ गड्यांनी पराभव केला होता. रबाडा हा ९०० गुणांचा टप्पा पार करणारा २३ वा आणि दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज आहे. याआधी, व्हर्नाेन फिलँडर, शॉन पोलॉक आणि डेल स्टेन यांनी ही कमाल केली आहे. भारतीय संघ सध्या कसोटी सामना खेळत नसला तरी आश्विनने २ स्थानांनी प्रगती केली. रवींद्र जडेजा तिसºया स्थानावर कायम आहे. फलंदाजीत स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. विराट कोहली दुसºया, तर चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी आहे. हाशिम आमलाने एका स्थानाने सुधारणा करीत नववे स्थान मिळवले.