Join us

आश्विन, जडेजाचे आव्हान पेलण्यास सज्ज; गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणार

भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत फिरकीपटू रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा यांचे आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे श्रीलंकेचा डावखुरा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने म्हटले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 05:53 IST

Open in App

कोलकाता : भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत फिरकीपटू रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा यांचे आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे श्रीलंकेचा डावखुरा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने म्हटले आहे.करुणारत्नेने भारताविरुद्ध सप्टेबर महिन्यात झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत आपल्या संघातर्फे सर्वाधिक २८५ धावा केल्या होत्या. त्यात त्याने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसºया डावात केलेल्या १४१ धावांच्या खेळीचा समावेश आहे.बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर पत्रकारांसोबत बोलताना करुणारत्ने म्हणाला, ‘जडेजा व अश्विन बळी घेण्यासाठी भुकेले आहेत, याची मला कल्पना आहे. त्यांना कुठलीही संधी न देणे आपल्या बेसिक्सवर कायम राहणे महत्त्वाचे ठरेल. मी धावा फटकावण्यासाठी योग्य चेंडूची प्रतीक्षा करणार आहे. यात जर यश मिळाले नाही तर काहीतरी वेगळे करीत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करील.’पाकिस्तानविरुद्ध गेल्या महिन्यात दुसºया कसोटी सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्मत १९६ धावांची खेळी करणाºया करुणारत्नेने भारताविरुद्धच्या १४१ धावांच्या खेळीमुळे आत्मविश्वास उंचावल्याचे म्हटले आहे.करुणारत्ने म्हणाला, ‘भारताविरुद्ध शतकी खेळीमुळे आत्मविश्वास उंचावला. दुसºया डावात फलंदाजी करणे सोपे नसते. मी आश्विनविरुद्ध धावा फटकावण्यासाठी उत्सुक होतो. पहिल्या पाच षटकांमध्ये कुठलीही जोखिम पत्करली नाही. हे सोपे नव्हते. मी माझ्या शैलीनुसार स्विप व रिव्हर्स स्विपचे फटके खेळलो.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :क्रिकेट