Ashish Nehra IPL 2022 : नारळ पाणी, पेन, पेपर!; आशिष नेहरा 'जी' ठरला गुजरातच्या यशामागील खरा 'हिरो'; RCB ला कळली असेल किंमत

Ashish Nehra IPL 2022 : रोहित शर्मानंतर ( १३ ) सर्वात कमी ( १५) सामन्यांत आयपीएल जेतेपद पटकावणारा हार्दिक पांड्या हा पहिलाच कर्णधार ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:32 AM2022-05-30T11:32:24+5:302022-05-30T11:32:59+5:30

whatsapp join usJoin us
Ashish Nehra was removed from RCB in 2019 and how he turned the tide with Gujarat Titans, Former India fast bowler scripted history on Sunday in IPL 2022 | Ashish Nehra IPL 2022 : नारळ पाणी, पेन, पेपर!; आशिष नेहरा 'जी' ठरला गुजरातच्या यशामागील खरा 'हिरो'; RCB ला कळली असेल किंमत

Ashish Nehra IPL 2022 : नारळ पाणी, पेन, पेपर!; आशिष नेहरा 'जी' ठरला गुजरातच्या यशामागील खरा 'हिरो'; RCB ला कळली असेल किंमत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ashish Nehra IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व संपले... नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans) १४ वर्षांनंतर आयपीएल फायनल खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) पराभूत करून जेतेपद पटकावले. रोहित शर्मानंतर ( १३ ) सर्वात कमी ( १५) सामन्यांत आयपीएल जेतेपद पटकावणारा हार्दिक पांड्या हा पहिलाच कर्णधार ठरला. हार्दिक, शुबमन गिल, डेव्हिड मिलर, राशिद खान, राहुल तेवातिया, मोहम्मद शमी, वृद्धीमान सहा, यश दयाल आदी खेळाडू GT च्या विजयाचे शिल्पकार ठरले. पण, गुजरात टायटन्सच्या या कामगिरीमागे खरा नायक आहे तो प्रशिक्षक आशिष नेहरा ( Ashish Nehra)... मैदानावर नारळ पाणी पिताना दिसणारा... पेन-पेपर घेऊन डावपेच आखणाऱ्या नेहराचा या विजयात सिंहाचा वाटा आहे..


क्रिकेट खेळत असताना दुखापतींशी संघर्ष करून त्याने स्वतःचा वेगळा ठसा उमटवला... त्यानंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला,  परंतु तेथेही त्याच्या वाट्याला संघर्ष आलाच, परंतु तरीही आशिष नेहराचा केअरफ्री अॅटिट्यूड काही गेला नाही. आशिष नेहरा दोन वर्ष रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) गोलंदाज प्रशिक्षकदी होता, पण त्याला २०१९मध्ये बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. नेहराने तेव्हा RCBला त्यांची कमकुवत बाजू दाखवून दिली होती, परंतु त्याच्या मताला किंमत दिली गेली नव्हती. पण, तेच गुजरात टायटन्सने त्याला फ्री हँड दिला. नेहरा व गॅरी कर्स्टन हे दोघंही आधी RCBसोबत होते आणि रविवारी त्यांनी गुजरातला जेतेपदापर्यंत पोहचवले. गुजरात टायटन्सच्या विजयानंतर RCBला नेहराची किंमत नक्कीच कळली असेल.  

गॅजेट्स अन् नेहरा यांचे कधीच जमले नाही आणि त्यामुळेच आयपीएल २०२२मध्ये नेहराच्या हाती पेन-पेपर नेहमी दिसले. तंत्रज्ञानापेक्षा त्याचा स्वतःच्या कौशल्यावर अधिक विश्वास आहे. गुजरात टायटन्सचा प्रत्येक खेळाडू नेहराचे कौतुक करतो. कर्णधार हार्दिक पांड्यानेही नेहराचे भरभरून कौतुक केले.   

आशिष नेहराचा विक्रम
भारताच्या माजी गोलंदाजाने आयपीएल २०२२ जेतेपदानंतर मोठा विक्रम नावावर केला. आयपीएल जेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय मुख्य प्रशिक्षक ठरला. शिवाय त्याने खेळाडू व प्रशिक्षक म्हणून आयपीएल चषक उंचावला आहे. सहा वर्षांपूर्वी २९ मे रोजीच त्याने सनरायझर्स हैदराबादकडून खेळाडू म्हणून जेतेपद पटकावले होते आणि काल २९ मे २०२२ मध्ये त्याने प्रशिक्षक म्हणून चषक उंचावला. रिकी पाँटिंग व शेन वॉर्न या दोघांनाच खेळाडू व मुख्य प्रशिक्षक म्हणून आयपीएल जिंकता आली होती.   

Web Title: Ashish Nehra was removed from RCB in 2019 and how he turned the tide with Gujarat Titans, Former India fast bowler scripted history on Sunday in IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.