Ashes ENG vs AUS : स्टीव्ह स्मिथने मोडला तेंडुलकर, गावस्करांचा विक्रम; सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

Ashes ENG vs AUS : ॲशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने ( Steve Smith) विक्रमी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 04:56 PM2023-06-29T16:56:24+5:302023-06-29T17:03:20+5:30

whatsapp join usJoin us
Ashes ENG vs AUS : History - Steve Smith ( 110) is the fastest to complete 32 Hundreds in Test cricket in terms of innings, Australia 9/400 | Ashes ENG vs AUS : स्टीव्ह स्मिथने मोडला तेंडुलकर, गावस्करांचा विक्रम; सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

Ashes ENG vs AUS : स्टीव्ह स्मिथने मोडला तेंडुलकर, गावस्करांचा विक्रम; सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ॲशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने ( Steve Smith) विक्रमी खेळी केली. त्याने कसोटी क्रिकेटमधील ३२वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गजांचा विक्रम मोडला. त्याची ११० धावांची खेळी ही सर डॉन ब्रॅडमन यांच्या एका विक्रमाशी बरोबरी करणारी ठरली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ४१६ धावांवर गडगडला. 


डेव्हिड वॉर्नर ( ६६), मार्नस लाबुशेन ( ४७) आणि ट्रॅव्हिस हेड ( ७७) यांनीही दमदार खेळ केला. वॉर्नर व उस्मान ख्वाजा बाद झाल्यानंतर लाबुशेन व स्मिथ यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धडा शिकवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. स्मिथने त्यानंतर हेडसोबत चौथ्या विकेटसाठी १२२ चेंडूंत ११८ धावा जोडल्या. पहिल्या दिवसाच्या ५ बाद ३३९ धावांवरून आजच्या खेळाची सुरूवात झाली. इंग्लंडने पटापट विकेट मिळवल्या, परंतु स्मिथ एकटा खिंड लढवताना दिसला. त्याने १८४ चेंडूंत १५ चौकारांसह ११० धावा केल्या. 


फॅब फोर खेळाडूंमध्ये स्मिथच्या नावावर सर्वाधिक ३२ कसोटी शतकं आहेत.. त्यानंतर जो रूट ( ३०), केन विलियम्सन ( २८) व विराट कोहली ( २८) यांचा क्रमांक येतो. इंग्लंडमध्ये पाहुण्या फलंदाजानी झळाकवल्या सर्वाधिक कसोटी शतकवीरांमध्ये स्मिथने ( ८) दुसरे स्थान पटकावताना स्टीव्ह वॉ ( ७) चा विक्रम मोडला. सर डॉन ब्रॅडमन यांनी ११ शतकं झळकावली आहेत. राहुल द्रविडच्या नावावर ६ शतकं आहेत.

स्मिथने ३२वे ( १७४ इनिंग्ज) शतक झळकावून ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. रिकी पाँटिंग ४१ शतकांसह ( २८७ इनिंग्ज) अव्वल स्थानी आहे.  पहिल्या १०० कसोटीमध्ये सर्वाधिक ३२ शतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन यांनी त्यांच्या पहिल्या १०० कसोटींत प्रत्येकी ३० शतकं झळकावली होती. इंग्लंडच्या खेळपट्टीवर कसोटीत २०००+ धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला.  डॉन ब्रॅडमन ( २६७४), अॅलेन बॉर्डर ( २०८२) व व्हिव्ह रिचर्ड्स ( २०५७) यांनी हा पराक्रम केलाय. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Ashes ENG vs AUS : History - Steve Smith ( 110) is the fastest to complete 32 Hundreds in Test cricket in terms of innings, Australia 9/400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.