Join us  

Ashes 2019 : 'सुपरमॅन'सारखी उडी घेत स्मिथने पकडली कॅच, व्हिडीओ वायरल 

स्मिथने यावेळी अफलातून कॅच टिपला आणि साऱ्यांनाच धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 4:33 PM

Open in App

लंडन, अ‍ॅशेस 2019 : आतापर्यंतच्या अ‍ॅशेस मालिकेत स्टीव्हन स्मिथने 700पेक्षा जास्त धावांचा रतीब घातला आहे. पण आता तर स्मिथने अफलातून कॅच पकडत साऱ्यांनाच धक्का दिला आहे. ही कॅच पकडल्यावर फलंदाजासहीत खेळाडूंनाही धक्का बसला होता. त्यामुळे ही कॅच तुम्ही पाहाल तर हैराण व्हाल. या कॅचचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात मिचेल मार्श 87वे षटक टाकत होता. त्यावेळी ख्रिस वोक्स सहा धावांवर खेळत होता. यावेळी एक चेंडू वोक्सच्या बॅटच्या कडेला लागला आणि तो स्लीपच्या दिशेने गेला. आता हा चेंडू सीमारेषेपार जाईल, असे वाटत होते. पण स्मिथने यावेळी अफलातून कॅच टिपला आणि साऱ्यांनाच धक्का दिला.

पाहा व्हिडीओ ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचे आव्हानअॅशेस मालिकेच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे 399 धावांचे आव्हान दिले आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली आहे.

इंग्लंडच्या जो डेन्ली (94) आणि बेन स्टोक्स (67) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 329 धावा केल्या. त्याचबरोबर पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियापुढे 399 धावांचे आव्हान ठेवता आले.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथअ‍ॅशेस 2019