Join us  

Ashes 2019 : स्टीव्हन स्मिथला बॉल लागल्यावर आता ऑस्ट्रेलिया घेणार मोठा निर्णय

या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 148.7 ताशी प्रति कि.मी. या वेगाने बाऊन्स टाकला. हा बाऊन्सर स्मिथच्या मानेला लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 6:41 PM

Open in App

अ‍ॅशेस 2019 : अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथला बॉल लागला होता. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की, त्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही. पण आता स्मिथला जबर दुखापत झाल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे, असे समजते आहे.

अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा सामना हा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 148.7 ताशी प्रति कि.मी. या वेगाने बाऊन्स टाकला. हा बाऊन्सर स्मिथच्या मानेला लागला. हा चेंडू एवढ्या जोरात स्मिथला लागला की, त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आलाच नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आता एक निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या सुरक्षेसाठी आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानेपर्यंत असलेले हेल्मेट वापरण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू नवीन हेल्मेटसह खेळताना दिसतील. त्यामुळे आता हे हेल्मेट कसे असेल, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

बॉल लागला, मैदानात पडला, बॅटींगला मुकला अन् आता खेळण्यासाठी सरसावलामैदानात बॉल लागल्यावर नेमके काय होईल, हे सांगता येत नाही. पण त्याला मैदानात बॉल लागला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. दुखापतीमुळे तो बॅटींगला मुकला, पण आता खेळण्यासाठी सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथची.

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला स्मिथला बाद करता आले नाही. पण आर्चरने एका बाऊन्सद्वारे स्मिथला जायबंदी केले आणि त्यामुळेच स्मिथला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही.  स्मिथ हा इंग्लिश गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू मानेवर लागून जखमी झाला. त्यावेळी स्मिथ 80 धावांवर खेळत होता. मात्र या वेदनेतून सावरत स्मिथने पुढे फलंदाजी केली. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मिथला त्रास होऊ लागला. त्यामुळे या सामन्यात पुढे खेळणे त्याच्यासाठी अशक्य झाले.

स्मिथ जायबंदी झाल्यावर पाचव्या दिवशी सकाळी सामनाधिकारी रंजन मदुगले यांची भेट घेऊन त्याच्या जागी मार्न्स लाबुशेन याचा संघात समावेश करण्याचे पत्र ऑस्ट्रेलियाने दिले. त्यानंतर उर्वरित लढतीसाठी लाबुशेनचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, फलंदाजीस आल्यावर लाबुशेन यालाही जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूचा प्रसाद मिळाला. मात्र लाबुशेनने धैर्याने खेळ करत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि 59 धावांची सुरेख खेळी करत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवण्यात मोलाचा वाटा उचलला.

पण आता तिसऱ्या सामन्यामध्ये आपण खेळू शकतो, अशी आशा स्मिथने व्यक्त केली आहे. याबद्दल स्मिथ म्हणाला की, " माझ्या दुखापतीची रोज चाचणी घेतली जाणार आहे. सध्या मी काहीही करू शकत नाही. पण काही दिवसांनी मी सराव करायला सुरुवात करणार आहे. मी फिटनेसवर अधिक भर देत आहे. त्यामुळे तिसऱ्या मी खेळेन, अशी मला आशा आहे. "

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने यावेळी जेव्हा स्मिथला चेंडू लागला तेव्हाचा अनुभव विशद केला. पॉन्टिंगला यावेळी 2005 साली झालेल्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसनने पॉन्टिंगसह मॅथ्यू हेडन आणि जस्टीन लँगर यांना जायबंदी केले होते.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथअ‍ॅशेस 2019