IPL 2022 KKR vs PBKS Live: पाहिलंत का कोण आलंय.... Aryan Khan, Suhana Khan सोबत Ananya Pandey देखील वानखेडे स्टेडियमवर!

त्यांचे फोटो अगदी लगेच व्हायरल झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 08:41 PM2022-04-01T20:41:33+5:302022-04-01T20:42:21+5:30

whatsapp join usJoin us
Aryan Khan hot bold Suhana Khan and Bollywood Actress Ananya Pandey in Wankhede Stadium to Cheer Kolkata team IPL 2022 KKR vs PBKS Live | IPL 2022 KKR vs PBKS Live: पाहिलंत का कोण आलंय.... Aryan Khan, Suhana Khan सोबत Ananya Pandey देखील वानखेडे स्टेडियमवर!

IPL 2022 KKR vs PBKS Live: पाहिलंत का कोण आलंय.... Aryan Khan, Suhana Khan सोबत Ananya Pandey देखील वानखेडे स्टेडियमवर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 KKR vs PBKS Live: आयपीएल आणि बॉलिवूड स्टार्स यांचं नातं चाहत्यांसाठी नवीन नाही. शाहरूख खान, शिल्पा शेट्टी, जुही चावला, प्रिती झिंटा यांसारखे बॉलिवूड स्टार्स अनेकदा IPL सामन्यांना हजेरी लावताना पाहिलेले आहेत. पण आता यंदाच्या IPL मध्ये बॉलिवूड स्टारकिड्सदेखील स्टेडियममध्ये आपल्या आवडत्या संघाला चीअर करायला आणि सामना पाहायला आल्याचं दिसतंय. KKRच्या पहिल्या सामन्यात शाहरूखचा मुलगा Aryan Khan याने हजेरी लावली होती. त्यानंतर आजच्या सामन्यात त्याच्यासोबत शाहऱुखची मुलगी Suahan Khan आणि चंकी पांडेची मुलगी व बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांनी वानखेडे मैदानावर उपस्थिती लावल्याचं दिसलं. त्यांचे स्टेडियममधील फोटो झटपट व्हायरल झाल्याचंही दिसून आलं.

--

--

--

दरम्यान, आज पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) असा सामना रंगला असून आहे हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाने शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) ला संघातून बाहेर केलं. शेल्डनच्या जागी संघात शिवम मावीला घेण्यात आलं. तर पंजाबच्या संघातदेखील एक मोठा बदल करण्यात आला. पंजाबने कगिसो रबाडाला (Kagiso Rabada) पदार्पणाची संधी दिली असून त्याच्या जागी संदीप शर्माला संघाबाहेर करण्यात आलं.

पंजाब किंग्ज: मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लिव्हिंगस्टोन, बी राजपक्षे (विकेटकीपर), ओडियन स्मिथ, एस खान, आर बावा, ए सिंग, एच ब्रार, कगिसो रबाडा, राहुल चहर.

कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), सुनील नरिन, शिवम मावी, टीम साऊदी, यू यादव, वरूण चक्रवर्ती.

 

Web Title: Aryan Khan hot bold Suhana Khan and Bollywood Actress Ananya Pandey in Wankhede Stadium to Cheer Kolkata team IPL 2022 KKR vs PBKS Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.