Join us  

अरविंद डीसिल्व्हा यांची सहा तास चौकशी; आज होणार संगकाराची साक्ष

माजी कर्णधार कुमार संगकारा याला अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाबाबत साक्ष नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. त्याला विशेष समितीपुढे साक्षीसाठी बोलविण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 12:04 AM

Open in App

कोलंबो : २०११ च्या विश्वचषकात भारताविरुद्ध अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाबाबत माजी कर्णधार आणि तत्कालीन निवड समिती प्रमुख अरविंद डीसिल्व्हा यांची बुधवारी सहा तास चौकशी झाली. भारताविरुद्ध २०११ च्या अंतिम सामन्यात सलामीवीराची भूमिका वठविणारा उपुल थरंगा याचीही साक्ष नोंदवण्यात आली आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला होता.वानखेडे स्टेडियम मुंबई येथे झालेला अंतिम समना फिक्स असल्याचा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिदानंदा अलुथगामगे यांनी केला होता. काही दिवसानंतर त्यांनी ‘यूटर्न’ घेत आपल्याला केवळ शंका येत असल्याचे म्हटले होते. २४ जून रोजी अलुथगामगे यांची साक्ष झाली होती. 

आज होणार संगकाराची साक्षमाजी कर्णधार कुमार संगकारा याला अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाबाबत साक्ष नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. त्याला विशेष समितीपुढे साक्षीसाठी बोलविण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. डेली मिरर या स्थानिक वृत्तपत्रानुसार मंत्रालयाच्या विशेष तपास विभागाने संगकाराची साक्ष नोंदवण्याचे आदेश दिले. संगकारा आज गुरुवारी सकाळी ९ वाजता साक्ष नोंदवण्यासाठी हजर होणार आहे.

टॅग्स :श्रीलंका