Join us  

Arun Jaitley Death : अरुण जेटलींनीच केली होती सेहवागची मनधरणी; त्यामुळेच तो क्रिकेट खेळायला झाला तयार

जेटली यांनी सेहवागची मनधरणी केल्यामुळेच तो क्रिकेट खेळायला लागला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 5:37 PM

Open in App

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. जेटली हे फक्त राजकारणी नव्हते, तर ते एक चांगले क्रिकेट प्रशासकही होते. दिल्लीच्या क्रिकेट मंडळात काम करताना त्यांनी बऱ्याच खेळाडूंच्या कारकिर्दीला आयाम दिला होता. आता भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचीच गोष्ट घ्या. जेटली यांनी सेहवागची मनधरणी केल्यामुळेच तो क्रिकेट खेळायला लागला होता.

नेमके घडले होते काय...वीरेंद्र सेहवाग हा दिल्लीकडून क्रिकेट खेळत होता. पण अंतर्गत राजकारणाचा त्याला फटका बसत होता. त्यामुळे त्याने दिल्लीच्या संघाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता.

जेटलींने नेमके काय केले...जेटलींना जेव्हा समजले की सेहवाग दिल्लीचा संघ सोडून हरयाणाला खेळायला जाणार आहे आणि त्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यावेळी जेटली यांनी स्वतहून सेहवागशी संपर्क साधला. त्याच्याबरोबर त्यांनी बराच वेळ बातचीत केली आणि अखेर सेहवागची मनधरणी करण्यात जेटली यशस्वी झाले होते. जेटली यांच्यामुळेच सेहवागने दिल्ली सोडून हरयाणामधून खेळण्याचा निर्णय बदलला होता.

जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्टनोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संघालाही जेटली यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना खेळत असलेला भारतीय संघ आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक खास गोष्ट करणार आहे.

एम्स रुग्णालयाने पत्रक जारी करत अरुण जेटलींच्या निधनाची माहिती दिली. शनिवारी दुपारी 12.07 वाजता जेटलींनी अखेरचा श्वास घेतल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. जेटलींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त होत आहे. देशाची मोठी हानी झाल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.

जेटलींच्या राजकारणाव्यतीरीक्त क्रिकेटवर देखील प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 

भारताचा संघ जेव्हा आज मैदानात उतरेल तेव्हा जेटली यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त करणार आहे. भारतीय आज मैदानात उतरताना काळ्या फीत लावून उतरणार आहे. त्याचबरोबर जेटली यांना श्रद्धांजलीही भारतीय संघाकडून वाहण्यात येणार आहे.

सेहवागने सांगितले की, अरुण जेटलींच्या निधनाच्या बातमीने खूप दू:ख झाले. तसेच जेव्हा दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष केले जात होते तेव्हा अरुण जेटलींनी दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष होण्याचे कारण ऐकून घेत अनेक क्रिकेटपटूंच्या समस्या देखील त्यांनी सोडविल्या.  त्यानंतर अनेक दिल्लीतील क्रिकेटपटूंना भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे सर्व जेटलींमुळेच शक्य झाल्याचे सेहवागने स्पष्ट केले. 

तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले. गंभीरनं, “वडिल तुम्हाला बोलायला शिकवतात, मात्र तुमच्या आयुष्यात जी व्यक्त पित्या समान असते ती तुम्हाला जीवनाच कसे वागायचे हे शिकवते. वडिल तुम्हाला नाव देतात, पण पित्या समान व्यक्ती तुम्हाला ओळख देतात. आज मी माझ्या पित्या समान व्यक्तीला गमावले. माझ्या शरीरातील एक भाग आज निखळला. सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, असे ट्वीट केले.

जेटलींना क्रिकेटमध्येही विलक्षण रस असल्याने क्रिकेट संघटनांमध्येही ते सक्रीय होते. सचिनला आव्हान देईल असा फलंदाज आमच्या दिल्लीत तयार होत आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा असे जेटलींनी हसत सांगितले होते. वीरेंद्र सेहवाग या त्यावेळच्या उदयोन्मुख खेळाडूकडे त्यांचा कटाक्ष होता. सचिनची जागा तो घेईल असे त्यांना वाटत होते. ते भविष्य खरे ठरले नाही, पण वीरेंद्र सेहवागच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटवर ठसा उमटविला हेही नाकारता येत नाही.

अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

टॅग्स :अरूण जेटलीविरेंद्र सेहवाग