Join us  

पाक कर्णधार सर्फराज अहमदनं 'कलम 370' बद्दल केलं विधान, म्हणाला...

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानातून त्यावर टीका होत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही बीजेपीच्या या निर्णयावर टीका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 6:36 PM

Open in App

लाहोर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानातून त्यावर टीका होत आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही बीजेपीच्या या निर्णयावर टीका केली आहे. आता त्यात पाक क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमदचीही भर पडली आहे. एका स्थानिक चॅनेलला मुलाखत देताना सर्फराजनं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर मत व्यक्त केले. पाकिस्तानी जनता काश्मीरींसोबत असल्याचे मत त्याने व्यक्त केले. यापूर्वी पाकचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीनेही या निर्णयावर टीका केली होती. 

पाकिस्तानकडून आतापर्यंत 114 वन डे सामना खेळणारा सर्फराज म्हणाला,''या कठीण प्रसंगातून काश्मीरच्या लोकांची लवकरात लवकर सुटका होऊदे, अशी मी अल्लाहकडे दुवा मागतो. काश्मीरच्या जनतेच्या दुःखात आम्ही सहभागी आहोता. पाकिस्तानची संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे.'' 

पाहा व्हिडीओ...

यापूर्वी आफ्रिदीनेही टीका केली होती. तो म्हणाला,''काश्मीरला संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाच्या आधारावर त्यांचे अधिकार द्यायला हवेत. सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार आहे. संयुक्त राष्ट्राची निर्मीती का केली गेली आहे आणि या प्रकरणात संयुक्त राष्ट्र झोपा काढत आहे का? काश्मीरात सातत्यानं मानवताविरोधी पावलं उचलली जात आहेत. त्याच्यावर लक्ष द्यायला हवे. डॉनल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणात मधस्थाची भूमिका पार पाडायला हवी.'' याआधीही आफ्रिदीनं काश्मीर मुद्यावर वादग्रस्त विधान केले आहे. कलम 370  हटवल्यानं सात महत्त्वपूर्ण बदल अंमलात येणार आहेत. त्यावर एक दृष्टिक्षेप... १. जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नसल्यानं दुहेरी नागरिकत्वाचा विषय संपुष्टात येईल. २. जम्मू-काश्मीरबाबत कुठलाही नवा कायदा करण्यासाठी आता राज्य सरकारच्या संमतीची गरज नसेल.३. राज्य सरकारच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकेल.४. अन्य राज्यातील नागरिकांना आता जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करता येईल, गुंतवणूक करता येईल.५. जम्मू-काश्मीर पोलीस केंद्र सरकारच्या, केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारित येतील.६. जम्मू-काश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा होता. तो आता नसेल. ७. राज्यावर आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा अधिकार मिळेल.

टॅग्स :कलम 370कलम 35-एजम्मू-काश्मीरपाकिस्तानशाहिद अफ्रिदी