Join us  

पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात माय-लेकाची १४३ धावांची भागीदारी; संघाला मिळवून दिला दणदणीत विजय

इंग्लंडची माजी क्रिकेटपटू अॅरन ब्रिंडल (  Arran Brindle ) हिनं तिच्या खात्यात आणखी एका विक्रमी खेळीची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 5:41 PM

Open in App

इंग्लंडची माजी क्रिकेटपटू अॅरन ब्रिंडल (  Arran Brindle ) हिनं तिच्या खात्यात आणखी एका विक्रमी खेळीची नोंद केली. ब्रिंडलनं पुरुषांच्या क्लब क्रिकेट सामन्यात स्वतःचा १२ वर्षीय मुलगा हॅरी ब्रिंडलसह सलामीला १४३ धावांनी विक्रमी भागीदारी केली. ओवम्बी सीसी ट्रोजान्स क्लबकडून खेळताना या माय-लेकानं नॅटेलहॅम क्रिकेट अकादमी एकादश संघाविरुद्ध लिनकोल्न अँड डिस्ट्रीक्ट लीगमध्ये विक्रमी भागीदारी करताना १४२ धावांचे लक्ष्य सहज पार केले.  

ब्रिंडलनं १३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत २८५२ धावा केल्या. तीन वेळा अॅशेस जिंकणाऱ्या इंग्लंड महिला संघाची ती सदस्य होती.   तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थॉम्पसन या नावानं पदार्पण केलं. १९९९मध्ये तिनं १५० धावांची भागीदारी केली आणि ती सर्वात युवा आंतरराष्ट्रीय कर्णधारांपैक एक आहे. तीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि त्याकालावधीत तिनं पुरुष क्रिकेट सामन्यांत आपला दम आजमावला. त्यांनंतर ती पुन्हा इंग्लंडच्या महिला संघात परतली. तीन वर्षांपूर्वी तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नवृत्ती घेतली.   २०११मध्ये पुरुषांच्या सेमी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली महिला होती. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ेय तिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतकही झळकावले. 

टॅग्स :इंग्लंड