Join us  

युवा गोलंदाजाला रिलीज केल्याचा LSG ला पश्चाताप; पठ्ठ्याने घेतल्या ८ विकेट्स, रचला इतिहास

लखनौ सुपर जायंट्सला आज त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत असेल. आयपीएल २०२४ पूर्वी संघातून रिलीज केलेल्या गोलंदाजाने आज विजय हजारे ट्ऱॉफीत ऐतिहासिक कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 6:58 PM

Open in App

हिमाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज अर्पित गुलेरियाने ( Arpit Guleria ) गुजरातची फलंदाजी उद्ध्वस्त करत १० पैकी आठ विकेट्स घेतल्या. विजय हजारे ट्रॉफ स्पर्धेतील ड गटातील सामन्यात त्याने ९ षटकांत ८ विकेट्स घेतल्या आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदवले. गुलेरियाने भारतीय देशांतर्गत क्रिकेट इतिहासातील दुर्मिळ स्पेलपैकी एक टाकली आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका इनिंग्जमध्ये ८ विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. पण, असा पराक्रम करणारा पहिला जलदगती गोलंदाज बनला.

गुलेरियाच्या दमदार कामगिरीनंतरही संघ हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधून हा सामना जिंकू शकला नाही. हिमाचल प्रदेशचा संघ गुजरातला ३२७ धावा करण्यापासून रोखू शकला नाही. ३२ व्या षटकापर्यंत संघाने २०० धावा पार करताना एकही विकेट गमावली नव्हती. ३३व्या षटकात २११ धावांवर पहिली विकेट पडली. यानंतर अर्पित गुलेरियाने गुजरातच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. संघ ४९ षटकांत ३२७ धावांपर्यंतच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात हिमाचल प्रदेश संघ ४९.५ षटकांत ३१९ धावांपर्यंत मजल मारू शकला.  

लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) ने आयपीएल लिलावापूर्वी अर्पित गुलेरियाला रिलीज केले होते, त्याला आयपीएल २०२३ च्या सीझनमध्ये दुखापतग्रस्त मयंक यादवच्या जागी करारबद्ध केले गेले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्पितचा रेकॉर्ड चांगला आहे. या चमकदार कामगिरीनंतर लखनौ सुपरजायंट्ससह अनेक संघ त्याला आपल्यासोबत घेण्यासाठी १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात मोठी बोली लावू शकतात. 

  • अर्पितने ५० धावांत ८ विकेट्स घेतल्या. यापूर्वी २००९मध्ये शोएब अहमद ( हैदराबाद) या जलदगती गोलंदाजने आंध्र प्रदेशविरुद्ध १५ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या.  
  • लिस्ट ए क्रिकेटमध्ये डावात ८ विकेट्स घेणारा अर्पित हा तिसरा भारतीय बनला आहे.  शाहबाज नदीमने ( ८-१०) आणि राहुल संघवीने ( ८-१५) यापूर्वी असा पराक्रम केला आहे. 
  • लिस्ट ए क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तो जगभरातील १५ वा गोलंदाज ठरला आहे.  
टॅग्स :विजय हजारे करंडकलखनौ सुपर जायंट्सआयपीएल २०२३आयपीएल लिलाव