Join us  

OMG : अमेरिकेत खेळण्यासाठी ३० भारतीय खेळाडूंचा निवृत्तीचा निर्णय, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचाही समावेश!

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद यानं नुकतंच देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अमेरिकेत खेळण्यासाठी निघून गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 1:43 PM

Open in App

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद यानं नुकतंच देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अमेरिकेत खेळण्यासाठी निघून गेला. त्यानं  #MinorLeagueCricket मध्ये आज अर्धशतकी खेळी केली. ( Unmukt Chand 56* off 57 Balls with 3 fours & 3 sixes against Golden State Grizzlies in #MinorLeagueCricket ) उन्मुक्त पाठोपाठ २०१२च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील फिरकीपटू हरमीत सिंग यानंही देशातील क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अमेरिकेत खेळण्यासाठी देशातील क्रिकेटला रामराम करण्याचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका हिंदी वृत्तपत्रकानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास ३० भारतीय खेळाडूंनी अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये ( MLC) खेळण्यासाठी बीसीसीआयकडे निवृत्ती जाहीर केली आहे.

जावेद मियाँदादनं भारतीय संघाबद्दल वापरले होते अपशब्द, रवी शास्त्री बूट हातात घेऊन धावले मारायला! 

MLC ही अमेरिकेत सुरू होणारी पहिली व्यावसायिक ट्वेंटी-२० लीग आहे. २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आयसीसीनं उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे अमेरिकेतही क्रिकेटचे वारे वाहू लागले आहेत. MLCमुळे अमेरिकेतील क्रिकेट चळवळीला वेग मिळत आहे. MLCनं जगभरातील अनेक क्रिकेटपटूंना या लीगमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे. 

सहा संघाचा समावेश असलेली ही लीग भविष्यात बीसीसीआयच्या आयपीएल प्रमाणे वर्चस्व गाजवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये सहभाग घेता येत नाही. त्यासाठी त्यांना देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागते. त्यामुळेच आता अमेरिकेत खेळण्यासाठी भारताचे खेळाडू निवृत्तीचा मार्ग निवडत आहेत. उन्मुक्त चंदसह राजस्थान रॉयल्सचा माजी गोलंदाज सिद्धार्थ त्रिवेदी,  मिलिंद कुमार, समित पटेल, मनन शर्मा आणि हरमीत सिंग यांनीही निवृत्ती घेतली आहे. नुकतेच श्रीलंकेचा निरोशान डिकवेला, कुसल मेंडीस आणि दानुष्का गुणतिलका यांनीही निवृत्ती जाहीर करताना MLC खेळण्याची तयारी केली आहे. 

टॅग्स :बीसीसीआयउन्मुक्त चंदअमेरिका
Open in App