मुंबई : दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने पुन्हा मुंबई संघासाठी लक्षवेधी कामगिरी करताना १९ वर्षांखालील कूच बिहार क्रिकेट स्पर्धेत अनिर्णित राहिलेल्या सामन्यात मध्य प्रदेशचा अर्धा संघ बाद केला. अर्जुनने पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर भेदक मारा केला.
बीकेसी-एमसीए मैदानावर झालेल्या या सामन्यात अर्जुनने दुसºया डावात २६ षटकांत ९५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. याआधी पहिल्या डावात अर्जुनला ४२ धावांत केवळ एका बळीवर समाधान मानावे लागले होते. मध्य प्रदेशने पहिल्या डावात ३६१ धावांची मजल मारल्यानंतर मुंबईने ५०६ धावांचा डोंगर रचत १४५ धावांची आघाडी घेतली. दुसºया डावात मध्य प्रदेशने ८ बाद ४११ धावांवर डाव घोषित करुन मुंबईला विजयासाठी २६७ धावांचे आव्हान दिले होते.