Join us  

भारताच्या निवड समितीसाठी तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंचे अर्ज

दोन पदांपैकी एक व्यक्ती थेट निवड समितीच्या अध्यक्षपदावरही जाऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 5:47 PM

Open in App
ठळक मुद्देनिवड समिती सदस्यांसाठी या आहेत अटी

मुंबई : बीसीसीआयमध्ये सध्या दोन पदांसाठी भरती आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली असून २४ जानेवारीपर्यंत इच्छूक व्यक्तींकडून अर्ज मागवले आहेत. या दोन्ही पदांसाठी गलेलठ्ठ पगारही देण्यात येणार आहे. बीसीसीआयची ही भरती निवड समितीसाठी आहे. कारण निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि निवड समिती सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या दोन पदांसाठी बीसीसीआयने २४ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत.

सध्याच्या घडीला निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि समिती सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे या दोन पदांसाठी बीसीसीआयला नियुक्ती करायची आहे. या दोन पदांपैकी एक व्यक्ती थेट निवड समितीच्या अध्यक्षपदावरही जाऊ शकते.

निवड समिती सदस्यासाठी सध्याच्या घडीला तीन माजी क्रिकेटपटूंनी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये पहिला क्रमांक माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा आहेत. लक्ष्मण यांच्याबरोबर राजेश चौहान आणि अमेय खुरासिया यांनी या पदांसाठी आतापर्यंत अर्ज दाखल केला आहे.

निवड समिती सदस्यांसाठी या आहेत अटीनिवड समिती सदस्यांसाठी काही अटीही यावेळी ठेवण्यात आल्या आहेत. अर्जदाराचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असू नये, ही पहिली अट आहे. त्याचबरोबर अर्जदाराने २० कसोटी आणि ३० प्रथम श्रेणी सामने किंवा १० एकदिवसीय आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.

टॅग्स :बीसीसीआय