Join us  

Corona Virus: विराट-अनुष्कानं नक्की किती रुपयांची केली मदत? आकडा जाणून तुम्हीही व्हाल थक्क

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कधी मदत करणार, असा सवाल नेटिझन्स करत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 1:11 PM

Open in App

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रेटी समोर आली. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी सलामीवीर गौतम गंभीर, अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना, इरफान व युसूफ पठाण, भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आदी सर्वांनी पुढाकार घेत आपापल्या परीनं निधी जमा केला. सोमवारी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मदत करण्याचा निर्णय सोशल मीडियावरून कळवला. पण, त्यांनी नक्की किती रक्कम दान केली, हे जाहीर केले नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार तो आकडा समोर आला आहे. अनुष्कानं ट्विट केलं की,''विराट आणि मी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मदत निधीत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक लोकांना होत असलेला त्रास बघून आम्हाला वेदना होत आहेत. आम्ही आमच्या परीनं मदत केली आहे.''  पण, बॉलिवूड इंडस्ट्रीतील सूत्रांच्या माहितीनुसार विरुष्कानं मिळून 3 कोटी रक्कम मदत म्हणून दिल्याचे समजते आहे. Bollywood Hungama या वेबसाईटने तसे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार आतापर्यंतची क्रिकेटपटूनं केलेली सर्वाधिक मदत आहे. याबाबत विराट अन् अनुष्का यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. 

कोणत्या क्रिकेटपटूंन किती मदत केली?गौतम गंभीर - 1.5 कोटी सुरेश रैना - 52 लाख ( 31 लाख पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर 21 लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी) सौरव गांगुली - 50 लाख (गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ) सचिन तेंडुलकर - 50 लाख ( केंद्र आणि राज्य सरकराला प्रत्येकी 25 लाख)अजिंक्य रहाणे - 10 लाख ( महाराष्ट्र राज्य सरकार)मुंबई क्रिकेट असोसिएशन - 1 कोटी ( केंद्र व राज्य सरकारला प्रत्येकी 50 लाख)बीसीसीआय - 51 कोटीयुसूफ व इरफान पठाण - 4000 मास्क

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याविराट कोहलीअनुष्का शर्मा