अनिल कुंबळेच्या 'त्या' एका रिप्लायने जिंकली लाखो मनं, फॅन्सची इच्छापूर्ती

माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 04:00 PM2018-10-10T16:00:34+5:302018-10-10T16:00:52+5:30

whatsapp join usJoin us
Anil Kumble's one reply won millions of hearts, fulfill fan wish | अनिल कुंबळेच्या 'त्या' एका रिप्लायने जिंकली लाखो मनं, फॅन्सची इच्छापूर्ती

अनिल कुंबळेच्या 'त्या' एका रिप्लायने जिंकली लाखो मनं, फॅन्सची इच्छापूर्ती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. दुखापत झालेल्या जबड्याला पट्टी बांधून मैदानात गोलंदाजी करणारा, पाकिस्तानचा संपूर्ण संघ तंबूत पाठवणारा कुंबळे अजूनही डोळ्यासमोर चटकन उभा राहतो. कुंबळेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. म्हणून त्याच्याशी संवाद साधण्यासाठी चाहते कायम आतुर असतात. अशाच एक प्रसंग फ्लाईटमध्ये घडला. कुंबळेने दिलेल्या  'त्या' एका रिप्लायने जिंकली लाखो मनं जिंकली.

कुंबळे ज्या फ्लाईटने प्रवास करत होता त्याच फ्लाईटमधील एका महिला प्रवासीने एक ट्विट केले. तिने लिहिले की,''मी प्रवास करत असलेल्या फ्लाईटमध्ये कुंबळेही आहेत. पण एवढ्या मोठ्या खेळाडूशी बोलावे कसे याची मला भिती वाटते.''



कुंबळेने हे ट्विट पाहिले आणि त्वरित त्याला रिप्लायही दिले. त्याने लिहिले की,''माझ्याशी बोलण्याचे कोणतेही दडपण घेऊ नका. फ्लाईट टेकऑफ केल्यानंतर तुम्ही या आणि माझ्याशी बोला.'' कुंबळेच्या या मोठेपणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. 


त्या महिलेने कुंबळे सोबत चर्चा केली आणि त्याचा ऑटोग्राफही घेतला. 


 

Web Title: Anil Kumble's one reply won millions of hearts, fulfill fan wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.