Join us  

मतभेद विसरून अनिल कुंबळे पोहचले विरूष्काच्या रिसेप्शनला

विरूष्काच्या या रिसेप्शनमध्ये एका पाहुण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 10:53 AM

Open in App
ठळक मुद्दे विरूष्काच्या या रिसेप्शनमध्ये एका पाहुण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं.टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी विरूष्काच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी इटलीमध्ये लग्न केलं. इटलीमधील शाही विवाहसोहळ्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये रिसेप्शन पार्टी दिली होती. दिल्लीतील रिसेप्शनला मित्रपरिवारांनी, खेळाडूंनी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. दिल्लीतील रिसेप्शननंतर विरूष्काचं 26 डिसेंबर रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन झालं. या रिसेप्शनला बॉलिवूड व क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली  होती. विरूष्काच्या मुंबईतील या रिसेप्शनमध्ये एका पाहुण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी विरूष्काच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिक कुंबळेंना न ठेवण्याची विराटची इच्छा होती. ज्यामुळे विराट व अनिल कुंबळे या दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 

क्रिकेटच्या मैदानावर दोघांमध्ये मतभेद असले तरी ते मतभेद बाजूला ठेवून अनिल कुंबळे यांनी विरूष्काच्या रिसेप्शनला हजेरी लावली. अनिल कुंबळे एक वर्ष टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक होते. कुंबळे यांचे प्रशिक्षक पदाचा करार वाढवला जाणार होता, पण विराटबरोबर असेलल्या मतभेदामुळे बीसीसीआयने त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती केली नसल्याची चर्चा आहे. यानंतर अनिल कुंबळे यांनी स्वतःहून प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. अनिल कुंबळे प्रशिक्षक असातना टीम इंडियाने लागोपाठ पाच टेस्ट सिरिज जिंकल्या. त्याशिवाय वनडे मालिकेत टीम इंडियाने न्यूझिलंडला हरवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम फायनलला चोहचली. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा याच्या रिसेप्शनला गेलेल्या अनिल कुंबळे यांची फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे. अनेकांनी हा फोटो शेअर केला. सोशल मीडियावर अनिल कुंबळेंचा फोटो शेअर करताना नेटीझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या. 

टॅग्स :विरूष्का वेडिंगविराट अनुष्का लग्नअनिल कुंबळेविराट कोहली