विराट कोहलीचा पारा चढला, शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममधील 'तो' Video Viral 

ICC ODI World Cup IND vs ENG Live : लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात विराट कोहलीने शून्यावर बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 04:33 PM2023-10-29T16:33:14+5:302023-10-29T16:33:39+5:30

whatsapp join usJoin us
Angry Virat Kohli loses cool in dressing room, hits sofa in frustration after scoring duck against England, Video | विराट कोहलीचा पारा चढला, शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममधील 'तो' Video Viral 

विराट कोहलीचा पारा चढला, शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममधील 'तो' Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs ENG Live : लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात विराट कोहलीने शून्यावर बाद झाला. वर्ल्ड कप स्पर्धेत विराट प्रथमच शून्यावर बाद झाला.  सचिन तेंडुलकरच्या ४९ वन डे शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याच्या निर्धाराने कोहली मैदानात उतरला, परंतु एकही धाव न काढता त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. 


भारताला चौथ्या षटकात ख्रिस वोक्सने धक्का दिला आणि अप्रतिम चेंडूवर शुबमन गिलचा ( ९) त्रिफळा उडवला. विराट कोहलीही शून्यावर डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन परतला. रोहित शर्माने संयमी खेळ केला होता, परंतु  श्रेयस अय्यर ( ४) पुन्हा अपयशी ठरला.  वोक्सच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात तो मिड ऑनला मार्क वूडच्या हाती सहज झेल देऊन परतला.  रोहितने ६६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावांचा टप्पाही ओलांडला. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५०+ धावा करणआऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने ( १२) संयुक्तपणे विराटसह दुसरे स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( २१) अव्वल स्थानी आहे.  


कोहली शून्यावर बाद झाला आणि जेव्हा तो पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा निराश झाला. त्याच्या बाद झाल्यानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात निराशेने ग्रासलेल्या कोहलीने अत्यंत रागाच्या भरात ड्रेसिंग रूमच्या सोफ्यावर काही ठोसे मारले. 

    
कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ वेळा शून्यावर बाद झाला आणि तो भारताकडून सचिन तेंडुलकरसह डकवर बाद होण्याच्या विक्रमात संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहे. विराटची इंग्लंडविरुद्धची ही १०वी खेळी होती जिथे तो भोपळ्यावर बाद झाला.  
 

Web Title: Angry Virat Kohli loses cool in dressing room, hits sofa in frustration after scoring duck against England, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.