Join us  

Andre Russell: आंद्रे रसेलने दोन चेंडूत फिरवली मॅच! RCBच्या दोन्ही अर्धशतकवीरांची एकाच षटकांत काढली विकेट

Andre Russel, IPL 2024 KKR vs RCB: जॅक विल्स आणि रजत पाटीदार यांनी केवळ ४८ चेंडूत शतकी भागीदारी केली होती. दोघेही तुफान फॉर्मात दिसत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 6:57 PM

Open in App

Andre Russel, IPL 2024 KKR vs RCB: कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ऑलराऊंडर आंद्रे रसेल आज गोलंदाजीत चमकला. KKRने प्रथम फलंदाजी करताना तुफान फटकेबाजीच्या जोरावर ६ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २२२ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याशिवाय फिल सॉल्टनेही ४८ धावा केल्या होत्या. RCB ने यंदाच्या हंगामात चौथ्यांदा २००हून अधिक धावा दिल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना RCBच्या दोन खेळाडूंनी अप्रतिम भागीदारी करण्यास सुरुवात केली होती. सामना कोलकातापासून दूर जाताना दिसत होता. त्याच वेळी रसेलने कोलकाताला दोन विकेट्स मिळवून देत सामन्यात ट्विस्ट आणला.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल फलंदाजीत फारसा प्रभाव पाडू शकला नसला, तरी गोलंदाजीत त्याने चमकदार कामगिरी केली. कोलकत्याच्या संघाने श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर 222 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना RCBने दोन गडी झटपट गमावले, पण जॅक विल्स आणि रजत पाटीदार या दोघांनी दमदार फटकेबाजी करत ४८ चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली. या दोघांनीही आपापली अर्धशतके ठोकली आणि दोघेही तुफान फॉर्मत खेळत होते. त्याचवेळी आंद्रे रसेलने आपल्या पहिल्याच षटकात दोनही अर्धशतकवीरांना झेलबाद करत सामना पलटवला.

रसेलचे ते षटक टर्निंग पॉईंट ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण RCBने विराट आणि डु प्लेसिसची विकेट स्वस्तात गमावली होती. ३५ वर २ विकेट गेलेल्या असताना जॅक विल्स आणि पाटीदार खेळायला आले. त्यांनी १०२ धावांची भागीदारी केली. पण रसेलने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये या दोघांनीही बाद करवले. विल्सने ३२ चेंडूत ५५ तर पाटीदारने २३ चेंडूत ५२ धावा कुटल्या होत्या.

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्सविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर