Join us  

...आणि झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू ढसाढसा रडू लागले, प्रेक्षकांचेही डोळे पाणावले!

आपल्या कामगीरीमुळं नाराज झालेल्या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आले होते...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 5:10 PM

Open in App

हरारे - मोहम्मद नाविदच्या घातक गोलंदाजीच्या बळावर संयुक्त अरब अमीरात (यूईए)ने विश्वचषक पात्रता फेरीत झिम्बाब्वेचा तीन धावांनी पराभव केला. झिम्बाब्वेला विजयासाठी 40 षटकांत 230 धावांचे लक्ष दिले होते. पण झिम्बाब्वेचा संघ सात बाद 226 धावांपर्यंतच मजल मारु शकणार आहे. 

यूईएकडून झालेल्या पराभवामुळं झिम्बाब्वेचा संघ 1983 नंतर पहिल्यांच विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास अपात्र ठरला आहे. झिम्बाब्वेच्या संघावर असा प्रसंग पहिल्यांदाच आला की विश्वचषक खेळू शकणार नाही. विश्वचषक खेळण्यास आपण अपात्र ठरलो हे स्पष्ट झाल्यानंतर झिम्बाब्वेच्या संघातील खेळाडू भावनिक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रूही आले. संघाला सपोर्टसाठी आलेल्या प्रेक्षकांचेही डोळे पाणावल्याचे चित्र स्टेडियममध्ये होते. झिम्बाब्वेवर जणू दुखाचा डोंगरच कोसळला होता. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक संघाचे विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न असते पण त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. त्यामुळं आपल्या कामगीरीमुळं नाराज झालेल्या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आले होते तर प्रेक्षकही भावनावश झाल्याचे चित्र मैदानावर होते. 

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आमच्याकडे अनेक संधी चालून आल्या होत्या. आमचा आतापर्यंतचा खेळ चांगला होता. परंतु, आजचा दिवस आमच्यासाठी निराशाजनक ठरला, अशी प्रतिक्रिया झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रेम क्रिमरने पराभवानंतर दिली. 

पावसामुळे डकवर्थ लुइस नियम लागू करण्यात आला. त्यानुसार झिम्बाब्वेला 40 षटकांत 230 धावांचे लक्ष्य देण्यात आले. झिम्बाब्वेची सुरूवातही निराशाजनक ठरली. पण नंतर विलियम्सने 80 धावा कुटल्या तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या सिकंदर रजाने 34 धावा केल्या. उर्वरित फलंदाज वेगाने धावा जमवण्यास अपयशी ठरले आणि त्यांचा संघ अवघ्या 3 धावांनी पराभूत झाला. झिम्बाब्वेच्या पराभवामुळे त्यांचे खेळाडू आणि चाहते नाराज झाल्याचे दिसून आले. या पराभवामुळे झिम्बाब्वेच्या भविष्याबद्दलही चर्चा होऊ लागली आहे. 

टॅग्स :आयसीसी विश्वकप २०१९