Join us  

... अन् शिखर धवनच्या बासरीचे सूर मोहात पाडतात तेव्हा

धवनला गब्बर या नावानेही ओळखतात, त्यामुळे धवन हा जशी आक्रमक फलंदाजी करतो, तसाच तो वैयक्तिक आयुष्यातही असेल, असे तुम्हाला वाटेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 8:45 PM

Open in App
ठळक मुद्देधवनने वाजवलेली धून ऐकली तर तो नेमका क्रिकेटपटू आहे की बासरी वादक, हा प्रश्न तुम्हाला पडेल.

नवी दिल्ली : आपल्या बहुतांशी वेळा दिसतं तसं नसतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीतील सुप्त गुण जेव्हा आपल्या समोर येतात, तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. आता भारताचा सलामीवीर शिखर धवनचेच उदाहरण घ्या ना. धवनला गब्बर या नावानेही ओळखतात, त्यामुळे धवन हा जशी आक्रमक फलंदाजी करतो, तसाच तो वैयक्तिक आयुष्यातही असेल, असे तुम्हाला वाटेल. पण त्याने वाजवलेली बासरी ऐकली तर तुम्हीही मोहात पडाल.

धवनने इंस्टाग्रामवर एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. या व्हीडीओमध्ये धवन आपल्या गुरुंबरोबर बासरी वाजवताना दिसत आहे. या दोघांनी जी धून वाजवली आहे ती ऐकली तर धवन नेमका क्रिकेटपटू आहे की बासरी वादक, हा प्रश्न तुम्हाला पडेल.

बासरी वादनाबद्दल धवन म्हणाला की, " बासरी हे माझे आवडते वाद्य आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी गुरु वेणुगोपालजी यांच्याकडे बासरी शिकत आहे. गेल्या तीन वर्षांमधला हा बासरी वादनाचा प्रवास आनंद देणारा आहे. आता तर मी एखादा रागही बासरीवर वाजवू शकतो." 

टॅग्स :शिखर धवनक्रिकेट