Join us
Daily Top 2Weekly Top 5

आनंदची खराब सुरुवात!

पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला ग्रां बुद्धिबळ टूर अंतर्गत सेंट लुई बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन पराभव पत्करावे लागले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:02 IST

Open in App

सेंट लुई (अमेरिका) : पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला ग्रां बुद्धिबळ टूर अंतर्गत सेंट लुई बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन पराभव पत्करावे लागले.नुकत्याच झालेल्या सिंक्वेफिल्ड स्पर्धेत संयुक्तपणे द्वितीय स्थानी राहिलेल्या आनंदला या जलद स्पर्धेत आपल्या खेळात बदल करण्यात अपयश आले. आनंदलाप्रथम अमेरिकेच्या हिकारु नाकामुराने नमवल्यानंतर अर्मेनियाच्यालेवोन अरोनियनने धक्का दिला. (वृत्तसंस्था)