सेंट लुई (अमेरिका) : पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला ग्रां बुद्धिबळ टूर अंतर्गत सेंट लुई बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन पराभव पत्करावे लागले.
नुकत्याच झालेल्या सिंक्वेफिल्ड स्पर्धेत संयुक्तपणे द्वितीय स्थानी राहिलेल्या आनंदला या जलद स्पर्धेत आपल्या खेळात बदल करण्यात अपयश आले. आनंदला
प्रथम अमेरिकेच्या हिकारु नाकामुराने नमवल्यानंतर अर्मेनियाच्या
लेवोन अरोनियनने धक्का दिला. (वृत्तसंस्था)