Join us  

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नुकताच 8 लाख रुपयांचा महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर विकत घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 9:48 AM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नुकताच 8 लाख रुपयांचा महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर विकत घेतला. चेन्नई सुपर किंग्सनं धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि तो प्रचंड व्हायरलही झाला होता. लॉकडाऊनच्या काळात धोनीनं ट्रॅक्टर खरेदी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. धोनीचं बाईक आणि कार प्रेम जगजाहीर आहे, परंतु धोनीनं ट्रॅक्टर का विकत घेतला, हा सर्वांना प्रश्न पडला. धोनीच्या या ट्रॅक्टर खरेदीवर महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी एक विधान केलं आहे. त्यांचं ते ट्विट आता व्हायरल होत आहे.

एका वृत्तानुसार धोनीनं आता सेंद्रिय शेती करणार आहे आणि त्यासाठी त्यानं हा ट्रॅक्टर खरेदी केला आहे. रांची येथे धोनचा 7 एकरात फार्म हाऊस आहे. त्यात त्यानं आलिशान बंगल्यासह बाईक्स आणि कारसाठी गॅरेज बनवलं आहे. उर्वरित जागेवर त्याला सेंद्रिय शेती करायची आहे. त्यासाठी धोनीनं महिंद्रा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर खरेदी केला. त्याच्या या निर्णयावर आनंद महिंद्रा म्हणतात,''महेंद्रसिंग धोनीकडे योग्य निर्णय घेण्याची कला आहे, हे मला माहित होते.'' गतवर्षी धोनीनं भारतीय सैन्याची 20 वर्ष जूनी गाडी विकत घेतली होती. जोंगा या गाडीचं उत्पादन 1999मध्ये बंद झाले. जपानच्या निसान या कार कंपनीनं ही गाडी तयार केली होती. 1999मध्ये भारतीय सैन्यानं त्याची खरेदी करणं बंद केलं आणि त्याजागी दुसऱ्या गाडींना प्राधान्य दिलं. पण, जोंगाला कुणीच टक्कर देऊ शकलं नाही. 2018मध्येही धोनी चेन्नईत ट्रॅक्टरवर स्वार झालेला दिसला होता. त्यानं टीम इंडियाची बसही चालवली आहे.  

धोनी जुलै 2019पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. धोनीच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल अजूनही स्पष्टता नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल) धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटले होते. पण, कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवरही अनिश्चिततेचं सावट आहे.  

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीमहिंद्रा