अष्टपैलू अनुजा पाटील करणार भारत ‘अ’ चे नेतृत्व

भारतासोबत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी आॅस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ मंगळवारी भारतीय महिला ‘अ’ संघासोबत सराव सामना खेळणार आहे. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व अष्टपैलू अनुजा पाटील करेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:15 IST2018-03-06T02:15:15+5:302018-03-06T02:15:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
 All-rounder Anuja Patil will lead India 'A' | अष्टपैलू अनुजा पाटील करणार भारत ‘अ’ चे नेतृत्व

अष्टपैलू अनुजा पाटील करणार भारत ‘अ’ चे नेतृत्व

मुंबई - भारतासोबत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी आॅस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ मंगळवारी भारतीय महिला ‘अ’ संघासोबत सराव सामना खेळणार आहे. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व अष्टपैलू अनुजा पाटील करेल.
अनुभवी फलंदाज मॅग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली येथे दाखल झालेल्या आॅस्ट्रेलिया संघाने रविवारी व सोमवारी कुर्ला परिसरामध्ये कसून सराव केला. आॅस्ट्रेलिया संघ येथे ६ व ८ मार्चला सराव सामने खेळणार असून १२ मार्चपासून प्रारंभ होणाºया एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बडोद्याला जाईल. या मालिकेनंतर २२ मार्चपासून मुंबईत टी-२० तिरंगी मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये इंग्लंडचाही समावेश असेल.

Web Title:  All-rounder Anuja Patil will lead India 'A'