Join us

अष्टपैलू हार्दिक पांड्याचा ‘पॉवर क्लास’ अनुकरणीय, फलंदाजी असो वा गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर परिस्थितीनुरूप योगदान

इंदूरमध्ये सुरुवातीला मिळालेल्या संधीचे सोने करण्यात आॅस्ट्रेलिया अपयशी ठरला. आघाडीची फळी कोसळल्यानंतर कामगिरीचा ठसा उमटविणारे फलंदाज नव्हतेच. मॅक्सवेलची ओळख धडाकेबाज फलंदाज अशीच आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:40 IST

Open in App

- सुनील गावस्कर लिहितात...

इंदूरमध्ये सुरुवातीला मिळालेल्या संधीचे सोने करण्यात आॅस्ट्रेलिया अपयशी ठरला. आघाडीची फळी कोसळल्यानंतर कामगिरीचा ठसा उमटविणारे फलंदाज नव्हतेच. मॅक्सवेलची ओळख धडाकेबाज फलंदाज अशीच आहे. तोदेखील मालिकेत लौकिकाला साजेशी खेळी करू शकला नाही. हार्दिककडून प्रेरणा घेत स्थिरावून खेळी केली असती तर मॅक्सवेल यशस्वी ठरला असता. अष्टपैलू हार्दिक सामन्यागणिक खेळात सुधारणा करीत आहे. फलंदाजी असो वा गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर परिस्थितीनुरूप योगदान देतो. फलंदाजीत बढती मिळाताच ‘पॉवर क्लास’चे त्याने उत्तम ताळमेळ साधले. दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वी ठरणे तशी अवघड बाब. पांड्याने मात्र कलात्मक पण धडाकेबाज फटकेबाजी आणि चतुरस्र गोलंदाजी केली. कधी बाऊन्सर तर कधी कमी-अधिक वेगाचे चेंडू टाकून फलंदाजांना कोंडीत पकडणे ही डोकेबाज क्रिकेटपटूची ओळख आहे. अनुभवासोबतच तो आणखी बहरत जाईल. मनीष पांडे हा देखील शानदार कामगिरीसह वाटचाल करीत आहे. इंदूरमध्ये सीमारेषेवर टिपलेला झेल हे समयसूचकतेचे उत्तम उदाहरण ठरावे.इंदूरमध्ये आॅस्ट्रेलिया ३०० धावांचा टप्पा ओलांडणार होता. पण कोहलीचे चाणाक्ष नेतृत्व तसेच वेळोवेळी गोलंदाजीतील बदल यामुळे पाहुणा संघ वंचित राहिला. कुलदीपने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविल्याने आॅस्ट्रेलियाच्या धावगतीवर आवर घालता आला.तासाभरानंतर रोहित शर्माची जादू चालली. शैलीदार फलंदाजीच्या बळावर त्याने होळकर मैदानावरील चाहत्यांना जिंकले. त्याने चेंडू उंचावरुन फटकविण्यास प्राधान्य दिले होते. काही फटके थेट स्टेडियमबाहेर गेले. अजिंक्य रहाणेदेखील मागे नव्हता. अलीकडे बंगळुरूची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक राहिली. रोहितसाठी मात्र ही खेळपट्टी लकी म्हणावी लागेल. दोन वर्षांआधी आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्याने याच मैदानावर द्विशतकी खेळी केली होती. अशास्थितीत भारतीय संघाला रोखण्यासाठी आॅस्ट्रेलियाने आता देवाचाच धावा बोलायला हवा. (पीएमजी)

टॅग्स :क्रिकेट