Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाडेकर यांनी 76व्या वर्षीही केली होती दमदार बॅटिंग

अजित वाडेकर यांचं निधन झालं, यावर विश्वास बसत नाहीए. कारण वयाच्या 77व्या वर्षीही ते फिट होते. वयाच्या 76व्या वर्षीही ते मैदानात उतरले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

By प्रसाद लाड | Updated: August 15, 2018 23:51 IST

Open in App

मुंबई - अजित वाडेकर यांचं निधन झालं, यावर विश्वास बसत नाहीए. कारण वयाच्या 77व्या वर्षीही ते फिट होते. वयाच्या 76व्या वर्षीही ते मैदानात उतरले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. शिवाजी पार्क आणि दादर युनियन यांच्यात गेल्यावर्षी एक प्रदर्शनीय सामना झाला होता, त्यामध्ये वाडेकर पॅड लावून बॅटिंगला उतरले होते, हे सांगितल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यामुळेच त्यांच्या आयुष्याचा डाव संपला, हे ऐकणं म्हणजे धक्काच होता. भारताला विजयाची ओळख करून देणारे कर्णधार, असा त्यांचा एका वाक्यात करायचा झाला तर उल्लेख करता येईल.वेस्ट इंडिज सारख्या दादा संघाला त्यांच्या मातीत नमवण्याचा पराक्रम त्यांनीच केला होता. त्यानंतर इंग्लंडलाही त्याच्या स्विंग खेळपट्टीवर भारताने पहिल्यांदा विजय त्यांनीच मिळवून दिला होता. भारत पहिला एकदिवसीय सामना खेळला तेव्हा कर्णधार होते ते वाडेकरच.एक आक्रमक फलंदाज आणि चाणाक्ष कर्णधार अशी त्यांची ओळख होती. काहीवेळा त्यांनी काही गोष्टी केल्या, त्याला अंधश्रद्धा म्हटलं गेलं. पण त्यामध्ये त्यांना नेहमीच यश मिळालं होतं. सुनील गावस्कर यांची एकदा फलंदाजी करताना पॅन्ट फाटली होती, पण ते चांगली फलंदाजी करत होते. ब्रेक झाला तेव्हा ते पॅव्हलियनमध्ये आले. त्यांनी पॅन्ट बदली करायला घेतली, पण वाडेकर यांनी त्यांना पॅन्ट बदली करायला दिली नाही. गावस्कर फाटक्या पॅन्टने फलंदाजी करत राहिले आणि त्यांचा धावाही होत गेल्या.गावस्करांचा अजून एक किस्सा आहे. वेस्ट इंडिजमद्ये सामना सुरू होता. सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार गावस्कर यांची भेट घायचा. त्यामुळे चारही दिवस  वेस्ट इंडिजचे सामन्यात वर्चस्व होते. सामन्याचा अखेरच्या दिवशी पुन्हा कर्णधार भारताच्या गोटात येणार, असं समजलं. तेव्हा वाडेकर यांनी गावस्कर यांना बाथरूममध्ये लपवून ठेवलं होतं. त्यामुळे वेस्ट इंडिजला हा सामना जिंकता आला नव्हता.

टॅग्स :क्रिकेटक्रीडा