अजिंक्य रहाणे OUT, महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर येणार? KKR विरुद्ध CSK ची प्लेइंग इलेव्हन

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:17 PM2024-04-08T18:17:05+5:302024-04-08T18:17:31+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane out, MS dhoni to bat at 3? CSK likely playing XI against KKR in IPL 2024 | अजिंक्य रहाणे OUT, महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर येणार? KKR विरुद्ध CSK ची प्लेइंग इलेव्हन

अजिंक्य रहाणे OUT, महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर येणार? KKR विरुद्ध CSK ची प्लेइंग इलेव्हन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, CSK vs KKR Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर ( KKR मेंटॉर) यांच्यातली चुरस पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईला घरच्या मैदानावर विजय मिळवण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. त्यांना मागील दोन अवे सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबादकडून हार पत्करावी लागली आहे. तेच श्रेयस अय्यरच्या KKR ने सलग तीन सामने जिंकले आहेत.


CSK चा संघ पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक आहे, परंतु त्यांना मागील दोन सामन्यांत एका समस्येने त्रास दिला आहे आणि तो म्हणजे कमी धावा... त्यांच्या फळीत स्टार फलंदाज असूनही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. ऋतुराज, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल यांना अपेक्षिक कामगिरी करता आलेली नाही.  चेन्नईला मागील सामन्यात मथिशा पथिरानाच्या माघारीमुळे एक बदल करावा लागला आणि मोईन अलीला संधी मिळाली. त्याच सामन्यातत मुस्ताफिजूर रहमानही व्हिसाच्या कामामुळे खेळू शकला नव्हता. पण, रहमान आजच्या सामन्यासाठी परतला आहे, परंतु पथिराना किंवा तो, अशी एकाचीच निवड करावी लागणार आहे.


ऋतुराज व रचिन हे सलामीला खेलतील. रचिनला सूर गवसला नसला तरी चेपॉकवर तो धावा करू शकतो आणि त्याने लवकरात लवकर लय पकडणे CSK साठी महत्त्वाचे आहे. अजिंक्य रहाणे सध्या संघर्ष करतोय आणि तिसऱ्या क्रमांकाला त्याने आतापर्यंत अपेक्षित न्याय दिलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून विश्रांती दिली जाऊ शकते आणि समीर रिझवीला संधी मिळू शकते. पण, रहाणेला वगळण्याची शक्यता फारच कमी आहे.


शिवाय महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो अशीची चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने शेवटच्या षटकांत १६ चेंडूंत ३७ धावांची खेळी केली होती. शिवम दुबे चौथ्या व डॅरिल मिचेल पाचव्या क्रमांकावर कायम राहिल. पथिरानाच्या येण्याने मोईन अली पुन्हा बाकावर बसेल. फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजा व मथिशा थिक्षना यांच्यावर असेल, तर दीपक चहर, तुषार देशपांडे व पथिराना जलद माऱ्याची जबाबदारी पार पाडतील. 

Web Title: Ajinkya Rahane out, MS dhoni to bat at 3? CSK likely playing XI against KKR in IPL 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.