Ajinkya Rahane, IPL 2022 SRH vs KKR Live: अजिंक्य रहाणेला कोलकाताने केलं संघाबाहेर; बदली खेळाडूवरून भन्नाट मीम्स व्हायरल

कोलकाताने संघात केले तब्बल ३ बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 08:26 PM2022-04-15T20:26:10+5:302022-04-15T20:26:50+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane out Aaron Finch In Playing Xi but Failed in Batting Hilarious Comedy memes Trolls Viral IPL 2022 SRH vs KKR | Ajinkya Rahane, IPL 2022 SRH vs KKR Live: अजिंक्य रहाणेला कोलकाताने केलं संघाबाहेर; बदली खेळाडूवरून भन्नाट मीम्स व्हायरल

Ajinkya Rahane, IPL 2022 SRH vs KKR Live: अजिंक्य रहाणेला कोलकाताने केलं संघाबाहेर; बदली खेळाडूवरून भन्नाट मीम्स व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ajinkya Rahane, IPL 2022 SRH vs KKR Live: कोलकाता विरूद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. SRH च्या संघातील वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी जगदीश सुचिथला संघात स्थान दिल्याचेही सांगितले. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघातील तीन बदल सांगितले. आरोन फिंच, शेल्डन जॅक्सन आणि अमन खान या तिघांना संघात संधी देण्यात आली. तर अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि रसिख सलाम यांना संघाबाहेर करण्यात आले. त्यातील अजिंक्य रहाणेच्या जागी संघात घेण्यात आलेल्या आरोन फिंचवरून भन्नाट मीम्स व्हायरल झाले.

आरोन फिंच मैदानात आला. गेल्या दोन सामन्यात अजिंक्य रहाणेची बॅट चांगली चालत नसल्याने त्याच्या जागी फिंचला संघात स्थान देण्यात आले. पण कोलकाताचा तो प्लॅन फसला. फिंचने फलंदाजीला षटकाराने सुरूवात केली, पण त्याला अवघ्या ७ धावांवर बाद व्हावे लागले. त्यामुळे अजिंक्यच्या जागी फिंचला घेऊन काहीच उपयोग झाला नाही. असा आशयाचे काही भन्नाट मीम्स नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याचे दिसून आले.

--

--

--

--

--

कोलकाता नाइट रायडर्स: आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (किपर), पॅट कमिन्स, सुनील नरिन, उमेश यादव, अमन खान, वरुण चक्रवर्ती

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (किपर), एडन मार्करम, शशांक सिंग, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन

Read in English

Web Title: Ajinkya Rahane out Aaron Finch In Playing Xi but Failed in Batting Hilarious Comedy memes Trolls Viral IPL 2022 SRH vs KKR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.