Join us
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षांच्या वयामध्ये आम्ही पृथ्वीच्या १० टक्केही नव्हतो - कोहली

नवी दिल्ली : पृथ्वी शानदार खेळाडू असून त्याचा स्वत:च्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. तो आक्रमक खेळाडू आहे. मात्र तरी ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 05:17 IST

Open in App

नवी दिल्ली : पृथ्वी शानदार खेळाडू असून त्याचा स्वत:च्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. तो आक्रमक खेळाडू आहे. मात्र तरी तो स्वत:च्या खेळावर नियंत्रण राखतो. आमच्यापैकी कोणीही १८ वर्षांचे असताना आमचा खेळ त्याच्या खेळाच्या १०% ही नव्हता,’ अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहली याने युवा पृथ्वी शॉ याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

नुकताच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या पृथ्वीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. पृथ्वीच्या आक्रमक आणि धाडसी खेळाचे सर्वजण कौतुक करत असून आता यामध्ये कोहलीनेही सुर मिसळले असून त्याने पृथ्वीच्या शानदार खेळाचे कौतुक केले. कोहली म्हणाला, ‘पृथ्वीच्या वयाचा असताना मी किंवा इतर कोणी खेळाडू त्याच्यासारखा १० टक्के प्रमाणेही खेळू शकत नव्हता. त्याच्यासारख्या निडर खेळाडूचा संघात समावेश असणे खूप चांगली बाब आहे. पृथ्वीने मिळालेली संधी चांगल्या प्रकारे साधली. संघाला चांगली सुरुवात करुन देण्याचा निर्धाराने खेळला. जेव्हा तुम्ही तुमच्या पहिल्याच मालिकेत अशी शानदार कामगिरी करता, तेव्हा याचे महत्त्व आणखी वाढते.

त्याचबरोबर, ‘पृथ्वी नक्कीच निडर खेळाडू, पण तो बेजबाबदार नाही. त्याचा स्वत:च्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला वाटत असेल की तो लगेच बॅटच्या कडेला चेंडू लागून बाद होईल. पण क्वचितच चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागतो. आम्ही त्याला इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना पाहिले आहे. तो आक्रमक असून स्वत:च्या खेळावर नियंत्रण राखतो आणि चुका करणे त्याला आवडत नाही,’ असेही कोहली म्हणाला.

टॅग्स :विराट कोहली