माही भाईसाठी कायपण...! 'मॅचविनर' जडेजाच्या पोस्टनं चाहत्यांची जिंकली मनं

ipl 2023 final : अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 03:45 PM2023-05-30T15:45:10+5:302023-05-30T15:45:37+5:30

whatsapp join usJoin us
 After winning the final match of IPL 2023, Ravindra Jadeja made a tweet for MS Dhoni which is going viral on social media  | माही भाईसाठी कायपण...! 'मॅचविनर' जडेजाच्या पोस्टनं चाहत्यांची जिंकली मनं

माही भाईसाठी कायपण...! 'मॅचविनर' जडेजाच्या पोस्टनं चाहत्यांची जिंकली मनं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK vs GT Final : रवींद्र जडेजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी चौकार लगावून आयपीएलला सोळावा चॅम्पियन दिला. चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्यांना पराभूत करून आयपीएलवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासाच प्रथमच एवढ्या उशिरा सामना खेळवला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी होणारा सामना सोमवारी घेण्यात आला. पहिला डाव झाल्यानंतर सोमवारी देखील पावसाने बॅटिंग करण्यास सुरूवात केली आणि खेळाडूंना बाकावर बसावे लागले. 

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रात्री उशिरापर्यंत चालला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. आयपीएल २०२३ चा संपूर्ण हंगाम महेंद्रसिंग धोनी या नावाभोवती राहिला. पण फायनलच्या सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मोहित शर्माने गतविजेत्यांना खुशखबर देताना सलग दोन चेंडूवर दोन बळी घेतले. धोनी पहिल्याच चेंडूवर मोहितचा शिकार झाला अन् स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली. पण रवींद्र जडेजा गुजरातसाठी काळ ठरला आणि त्यानं अखेरच्या २ चेंडूमध्ये १० धावा कुटल्या अन् विजय साकारला.

माही भाईसाठी कायपण - जडेजा
सामन्यानंतर रवींद्र जडेजाने ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. "आम्ही हे सगळं काही फक्त महेंद्रसिंग धोनीसाठी केले आहे. माही भाई तुझ्यासाठी कायपण", जडेजाच्या या ट्विटवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

भारतात क्रिकेटची भलतीच 'क्रेझ', IPL फायनलचा सामना मध्यरात्री पण कोट्यवधी लोकांचं जागरण

जड्डूच्या चौकाराने चेन्नईचा 'पाचवा' पराक्रम
गुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर पराभूत करून धोनीच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब उंचावला. अखेरच्या षटकांतील शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने अनुभवाचे कौशल्य दाखवले. मोहित शर्माच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं चाहत्यांना जागं केलं. तर, अखेरचा चेंडू जड्डूच्या पायाला लागून सीमीरेषेकडं गेला अन् चेन्नईच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

 

 

Web Title:  After winning the final match of IPL 2023, Ravindra Jadeja made a tweet for MS Dhoni which is going viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.