lionel messi: वर्ल्ड कप हिरो लिओनेल मेस्सी आता अर्जेंटिनाच्या नोटांवर?...काहीही हं!

अलीकडेच पार पडलेल्या फिफा विश्वचषकाचा किताब अर्जेंटिनाच्या संघाने पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 02:16 PM2022-12-22T14:16:29+5:302022-12-22T14:17:32+5:30

whatsapp join usJoin us
After winning the FIFA World Cup 2022 title, the Argentine government is all set to put Lionel Messi's photo on its currency  | lionel messi: वर्ल्ड कप हिरो लिओनेल मेस्सी आता अर्जेंटिनाच्या नोटांवर?...काहीही हं!

lionel messi: वर्ल्ड कप हिरो लिओनेल मेस्सी आता अर्जेंटिनाच्या नोटांवर?...काहीही हं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली :

अलीकडेच पार पडलेल्या फिफा विश्वचषकाचा किताब अर्जेंटिनाच्या संघाने पटकावला. विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. जगभरात मेस्सीचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. विश्वचषकाची ट्रॉफी जिंकून मायदेशात गेलेल्या मेस्सी आणि त्याच्या संघाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर लाखो लोक मेस्सी ंड कंपनीच्या स्वागतासाठी जमले होते. मात्र आता येत असलेल्या बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता अर्जेंटिनासरकार तेथील नोटांवर मेस्सीचा फोटो लावणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि एकच धमाल उडाली.

मेस्सीचा फोटो देशाच्या चलनावर दिसणार अशी नुसती कल्पना लोकांनी केली नाही. तर मेस्सीचा फोटो असलेल्या नोटाही डिझाइन करुन इंटरनेटवर व्हायरल केल्या आहेत. विश्वचषकाच्या आनंदात देशाला सर्वात मोठा सन्मान किंवा सर्वात मोठा पुरस्कार मिळतो हे सर्वांनी पाहिले आहे, पण हा असला प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळला आहे. नेटिझन्सनी मेस्सीचा फोटो असलेल्या नोटांचे डिझाइन सोशल मीडियात व्हायरल केले आहेत.  

मेस्सीची 'स्वप्नपूर्ती'
दरम्यान, ही बाब अद्याप विचाराधीन आहे. पण, अर्जेंटिनाच्या सरकारी विभागातही याबाबत अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथील सरकारने आणि खासकरून आर्थिक बाबी पाहणाऱ्यांनी विश्वचषकात मिळालेले यश पाहता याबाबत विचार सुरू केल्याचे वृत्त आहे. FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. लक्षणीय बाब म्हणजे मेस्सीचे हे पहिलेच विश्वचषक विजेतेपद होते. मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या संघाने 36 वर्षांचा दुष्काळ संपवून विश्वचषकाचा किताब पटकावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: After winning the FIFA World Cup 2022 title, the Argentine government is all set to put Lionel Messi's photo on its currency 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.