Join us  

सचिन तेंडुलकर, जयसूर्या आणि मियाँदाद यांच्यानंतर कोणी २० वर्षे क्रिकेट खेळले आहे; केबीसीमध्ये विचारला लाख मोलाचा प्रश्न

या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन यांनी अंकिता कौल यांना हा प्रश्न विचारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 2:52 PM

Open in App

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या आणि जावेद मियाँदाद यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर २० वर्षांपेक्षा जास्त काळ खेळाची सेवा केली. पण यांच्यानंतर कोणता क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर २० वर्षे खेळला आहे, असा लाख मोलाचा प्रश्न कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारला गेला होता.

या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन यांनी अंकिता कौल यांना हा प्रश्न विचारला.  या प्रश्नासाठी अमिताभ यांनी अंकिता यांना चार पर्यायही दिले. हे पर्याय नेमके कोणते जाणून घ्या...

या प्रश्नासाठी पुढील पर्याय देण्यात आले. १. मिताली राज, २. कार्लोस एडवर्ड, ३. ख्रिस गेल आणि ४. शोएब मलिक. हे चार पर्याय मिळाल्यावर अंकिता यांनी काही काळ विचार केला आणि त्यांनी ख्रिस गेल हा पर्याय निवडला.

अंकिता यांनी सांगितलेला पर्याय अमिताभ यांनी लॉक केला. पण अंकिता यांचे हे उत्तर चुकीचे असल्याचे पाहायला मिळाले. या प्रश्नाचे अचूक उत्तर मिताली राज हे होते.

टॅग्स :मिताली राजख्रिस गेल