Join us  

पाकिस्तानी क्रिकेटपटूचं 'हे' दिव्य इंग्रजी वाचून हसून हसून पुरेवाट होईल!

पाकिस्तानच्या ' या ' क्रिकेटपटूने आपण किती मूर्ख आहोत, हे सिद्ध करण्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. आपल्या मोठ्या भावाला 'बिग ब्रदर' म्हणण्याऐवजी ' या ' क्रिकेटपटूने ' लार्ज ब्रदर' म्हणत अकलेचे तारे तोडले आहेत. फक्त एवढ्यावरच तो थांबला नाही तर एका वाक्यात त्याने बरेच दिवे लावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 5:03 PM

Open in App
ठळक मुद्दे या पोस्टमुळे त्याची बऱ्याच जणांनी खिल्ली उडवली. त्यामुळे आपली चूक लक्षात आल्यावर उमरने ही पोस्ट काढून टाकली आहे.

कराची : एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर ती करू नये. पण काही गोष्टींचे ज्ञान नसताना ती गोष्ट करायला कुणी गेलं की त्याची बौद्धिक दिवाळखोरी साऱ्यांपुढे आल्यावाचून राहत नाही. पाकिस्तानच्या ' या ' क्रिकेटपटूने आपण किती मूर्ख आहोत, हे सिद्ध करण्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. आपल्या मोठ्या भावाला 'बिग ब्रदर' म्हणण्याऐवजी ' या ' क्रिकेटपटूने ' लार्ज ब्रदर' म्हणत अकलेचे तारे तोडले आहेत. फक्त एवढ्यावरच तो थांबला नाही तर एका वाक्यात त्याने बरेच दिवे लावले आहेत. त्याचं 'हे' दिव्य इंग्रजी वाचून हसून हसून पुरेवाट होईल, एवढं मात्र नक्की.

काही जणांना इंग्रजीमध्ये संवाद साधणे जमत नाही, तसेच काही खेळाडूंचेही आहे. सुरुवातीला बऱ्याच खेळाडूंना इंग्रजीत बोलण्यात समस्या जाणवते. पण कालांतराने मात्र ते अस्खलित इंग्रजी बोलतात. पण पाकिस्तानच्या ' या '  खेळाडूची गोष्टच वेगळी आहे. आपले स्टेटस किती उंचावले आहे, हे दाखवण्यासाठी त्याने इंग्रजी या भाषेचा वापर करायचे ठरवले. ही भाषा त्याला पूर्णपणे ज्ञात नव्हती. त्यामुळेच त्याच्याकडून ही घोडचूक झाल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या ट्वेन्टी-20 लीग सुरु आहे. या लीगमध्ये कामरान अकमलने दमदार कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्यानंतर कामरानने आपल्या मुलांसह मैदानात एक फोटो काढला. हा फोटो कामरानचा लहान भाऊ उमरने ट्विटरवर शेअर केला आहे. तोपर्यंत सारं काही आलबेल होतं. पण त्या फोटोवर जे काही उमरने लिहीलं त्यामधून त्याचं इंग्रजीचं ज्ञान सर्वांना समजू शकेल.

आपल्या ट्विटरवरून उमरने कामरानचा फोटो पोस्ट केला आणि त्यावर लिहीलं की, " माय लार्ज ब्रदर विथ हर स्मॉल अँड लार्ज किड्स आफ्टर मेन ऑफ मॅच इन पीएसएल. " या पोस्टमुळे त्याची बऱ्याच जणांनी खिल्ली उडवली. त्यामुळे आपली चूक लक्षात आल्यावर उमरने ही पोस्ट काढून टाकली आहे.

टॅग्स :पाकिस्तान