Join us  

पत्नी धनश्री नव्हे तर चहलने दुसऱ्याच व्यक्तिला 'गुडघ्यावर' बसून केलं प्रपोज; सोशल मीडिया 'सैराट'

 yuzvendra chahal wife : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 6:22 PM

Open in App

dhanashree verma and chahal । नवी दिल्ली : भारतीय संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा (rajasthan royals) प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो. चहल आणि राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरची मैत्री जगजाहीर आहे. बटलर आयपीएलसाठी जेव्हा भारतात आला तेव्हा त्याने प्रथम चहलबद्दल विचारणा केली होती. आता चहलने गुडघ्यावर बसून बटलरला प्रपोज करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. चहलच्या या फोटोवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल आहेत.

याशिवाय नेटकरी चहलची पत्नी धनश्री वर्माबद्दल काही हास्यास्पद मीम्स शेअर करून चहलच्या या फोटोची फिरकी घेत आहेत. 

दरम्यान, आयपीएलच्या सोळाव्या हंगामात युजवेंद्र चहल शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने सहा सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहेत. मागील वर्षी देखील चहलने १७ सामन्यांत २७ बळी घेतले होते आणि पर्पल कॅप पटकावली होती. चहल मोठ्या कालावधीपर्यंत आरसीबीच्या फ्रँचायझीचा भाग होता पण मेगा लिलावापूर्वी त्याला बंगळुरूच्या फ्रँचायझीने रिलीज केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३राजस्थान रॉयल्सजोस बटलरयुजवेंद्र चहलमिम्स
Open in App