Join us  

"महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीने रिषभ पंत अन्  लोकेश राहुलला निवांत झोप लागली असेल!"

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी इस्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 6:35 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी इस्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. जुलै 2019पासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती अन् शनिवारी स्वातंत्र्य दिनी धोनीनं निवृत्तीची घोषणा केली.  भारतीय  धोनीनं शनिवारी सायंकाळी 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. पण, धोनीच्या या निवृत्तीनंतर रिषभ पंत आणि लोकेश राहुल यांना निवांत झोप लागली असेल, असे खोचक ट्विट ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डीन जोन्स यांनी केलं. धोनीच्या निवृत्तीनंतर पंत व राहुल यांच्याकडे त्याचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. 

''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीनं ही पोस्ट करून चाहत्यांना झटका दिला.  धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.

जुलै 2019नंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. तेव्हा भविष्यात त्याची जागा भरून काढणारा खेळाडू म्हमून रिषभ पंतला पुढे केलं गेलं. निवड समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद यांनी जाहीरपणे पंतला पाठींबा दिला. रिषभला या विश्वासावर खरं उतरता आलं नाही. न्यूझीलंड दौऱ्यात लोकेश राहुलकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी दिली आणि त्यानं ती सक्षमपणे पेलून दाखवली. त्यामुळे रिषभच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे साहजिक होते. त्याचवेळी धोनीच्या निर्णयावर पंत व लोकेश यांची पुढील वाटचाल अवलंबून होती. आता धोनीनं निवृत्ती जाहीर केल्यामुळे दोघांवरील दडपण नक्कीच कमी झालं असेल. त्यामुळेच जोन्स यांचं ट्विट प्रचंड व्हायरल झालं. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

टाटा सन्स, बायजूला मागे सारून 'ड्रीम 11' झाले IPL 2020 चे स्पॉन्सर, मोजले 222 कोटी

Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार

पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं! 

हार्दिक पांड्याने जाहीर केलं मुलाचं नाव; बघा या फोटोत तुम्हाला सापडतंय का?

किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघ मैदानावर उतरणार; थोड्यावेळात ट्वेंटी-20चा थरार सुरू होणार

IPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पोल पोझिशनवर असलेले 'टाटा सन्स'चं नेमकं काय चुकलं? 

शाळेची फी भरायला नव्हते पैसे, तो मुलगा ‘खेलरत्न’ पुरस्काराचा मानकरी ठरला; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं कौतुक

 

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीलोकेश राहुलरिषभ पंत