Join us  

धक्कादायक! पावसामुळे सामना रद्द झाल्यावर तीन क्रिकेटपटू पी पी प्यायले आणि हॉटेलमध्ये...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 5:45 PM

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. आता तर तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तिसरा सामना होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

पावसामुळे सामना रद्द झाल्यावर तीन खेळाडूंनी मद्यपान केल्याची एक घटना घडली आहे. सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर या तीन क्रिकेटपटूंना मद्यपानाला सुरुवात केली. या तिघांनी एवढे मद्यप्रशान केले होते की, त्यांची शुद्धच हरपली होती. आपण नेमके काय करत आहोत,हेदेखील त्यांनी कळत नव्हते. हे तीन खेळाडू वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या लॉबीमध्ये आले आणि ओकले. त्यानंतर या खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या खेळाडूंनी मद्यपान केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील काही स्पर्धांसाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही गोष्ट घडली ती नुकत्याच झालेल्या 19-वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत. ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्यात आली होती आणि यजमान देशाच्याच खेळाडूंकडून हे कृत्य पाहायला मिळाले होते. या खेळाडूंची नावे जाहीर करण्यास नकार देण्यात आला आहे. या तीन खेळाडूंमध्ये दोन फलंदाज आहेत तर एक गोलंदाज. 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यानंतर ही घटना घडल्याचे समजते आहे. या घटनेनंतर खेळाडूंवर बंदी घालण्यात येणार असून आगामी बांगलादेशच्या दौऱ्यासाठी त्यांना संघातून वगळण्यात आले आहे.

टॅग्स :श्रीलंका