Join us  

"मी तुझ्या लग्नात नाचायला येईन", एका षटकात ५ सिक्स ठोकल्यानंतर शाहरूखचं रिंकूला 'प्रॉमिस'

shahrukh khan on rinku singh : केकेआरचा युवा खेळाडू रिंकू सिंग सलग ५ षटकार ठोकल्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 5:49 PM

Open in App

rinku singh sixes । मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) युवा खेळाडू रिंकू सिंग त्याच्या मॅचविनिंग खेळीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. रिंकूने गुजरात टायटन्सविरूद्ध  (KKR vs GT) अखेरच्या षटकात सलग पाच षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला होता. ९ एप्रिल रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रिंकूने यश दयालच्या एका षटकात सलग पाच षटकार ठोकले अन् यजमानांना पराभवाची धूळ चारली. 

दरम्यान, या मॅचविनिंग खेळीनंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी रिंकूचे कौतुक केले. अशातच केकेआरच्या संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने देखील रिंकूला फोन करून एक प्रॉमिस केले, ज्याचा खुलासा खुद्द रिंकूने केला आहे. रिंकूने शाहरूखच्या मेसेजबद्दल सांगितले, "शाहरूख सरांनी मला सांगितले की, मला लोक त्यांच्या लग्नांमध्ये बोलवत असतात. तरीदेखील मी कधीच जात नाही. पण मी तुझ्या लग्नात नाचायला नक्की येईन."

अखेरच्या षटकात मोठा ट्विस्टगुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात रिंकू सिंगने ऐतिहासिक खेळी केली होती. अखेरच्या षटकांत केकेआरला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने स्फोटक खेळी करून सामन्याचा निकाल बदलला. यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ षटकार ठोकून केकेआरने सलग दुसरा विजय नोंदवला. रिंकूने ६ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने त्या सामन्यात २१ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी केली होती. अखेर केकेआरने २० षटकांत ७ बाद २०७ धावा करून गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला. सलग पाच चेंडूवर षटकार मारल्याने गुजरातचा गोलंदाज यश दयालला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सगुजरात टायटन्सशाहरुख खानरिंकू सिंग
Open in App