Join us

कपिलदेवनंतर हार्दिक आदर्श अष्टपैलू, अशा खेळाडूची संघाला होती प्रतीक्षा

कपिलदेव यांच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाला हार्दिक पांड्याच्या रुपाने आदर्श अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, असे मत भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक व माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 03:36 IST

Open in App

मुंबई : कपिलदेव यांच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाला हार्दिक पांड्याच्या रुपाने आदर्श अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे, असे मत भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक व माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.राजपूत म्हणाले, ‘पांड्या असाधारण क्रिकेटर आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीपासून (एनसीए) मी त्याच्यातील गुणवत्ता पाहत आहे. तो माझ्यासोबत विभागीय शिबिरातही होता. त्याच्यामध्ये गुणवत्तेची कोणतीही कमतरता नाही. कपिलदेवनंतर संघाला त्याच्यारुपाने एक आदर्श अष्टपैलू खेळाडू लाभला आहे.’राजपूत यांनी म्हटले, ‘पांड्याची फलंदाजी चांगली असून तो सर्व प्रकारांमध्ये खेळू शकतो. पहिले लोकांना वाटत होते, की तो केवळ टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांतच खेळू शकतो. पण तो एकटा कसोटी सामन्याचे चित्र पालटवू शकतो. त्याने चेन्नई येथे आॅस्टेÑलियाच्या हातून एकदिवसीय सामना खेचून घेतला.’ त्याचप्रमाणे, ‘पांड्या चेंडू सीमारेषेपार घालवण्याची क्षमता राखून आहे. चांगल्या फलंदाजाची ही ओळख आहे. शिवाय त्याची गोलंदाजीही चांगली असून तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. पुढील कपिलदेव बनण्याचे सर्व गुण त्याच्यात आहेत. मात्र, तरीही स्वत:ला कपिलच्या दर्जाचा बनवण्यासाठी हार्दिकला नेहमी स्वत:ला सिद्ध करावे लागेल.ो असा अष्टपैलू आहे, ज्याची संघाला खूप काळापासून प्रतीक्षा होती,’ असेही राजपूत म्हणाले.।आॅस्टेÑलियाला नमवणे कठीण असते, परंतु भारतीय संघ चांगल्या लयीमध्ये आहे. कारण त्यांनी आपला पहिला सामना जिंकला आहे. आपला संघ उच्च दर्जाचे क्रिकेट खेळत असून आपल्या संघाला हरवणे खूप कठीण आहे.- लालचंद राजपूत