Join us  

मोहम्मद शामीची अपघातानंतर पत्नी हसीन जहाँने घेतली भेट

गाझियाबाद येथील रेडिसन्स येथील हॉटेलमध्ये शामी हसीनला भेटला. यावेळी शामीने आपल्या मुलीला उचलून घेतले आणि तिच्याशी संवाद साधला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 7:49 PM

Open in App
ठळक मुद्देया दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांनंतर त्यांच्यामधली ही पहिलीच भेट आहे.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या गाडीला अपघात झाला होता. काही दिवसांपासून तो आपली पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांनी दु:खी होता. पण या अपघातानंतर हसीनने शामीची भेट घेतली आहे. 

डेहराडूनहून दिल्लीला येत असताना शामीच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात शामीला किरकोळ दुखापत झाली होती. पण यानंतर त्याची पत्नी हसीनने त्याची भेट घेतली. गाझियाबाद येथील रेडिसन्स येथील हॉटेलमध्ये शामी हसीनला भेटला. यावेळी शामीने आपल्या मुलीला उचलून घेतले आणि तिच्याशी संवाद साधला. या दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांनंतर त्यांच्यामधली ही पहिलीच भेट आहे.

पत्नी हसीन जहाँनने केलेल्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शमीच्या गाडीला रविवारी पहाटे अपघात झाला असून, डेहराडूनहून दिल्लीकडे येत असताना ट्रकने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तो किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

या भेटीनंतर हसीन म्हणाली की, " शामी हा काही माझा शत्रू नाही. पण त्याने माझ्याबाबत जे केले ते वाईट आहे. या साऱ्या गोष्टींची त्याला जाणीव व्हावी आणि त्याने माफी मागावी, एवढीच माझी इच्छा आहे. तो माझा नवरा आहे, त्यामुळे त्याची प्रकृती सुधारावी, यासाठी मी प्रार्थना करेन. " 

काय आहे प्रकरणहसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.

टॅग्स :मोहम्मद शामी