Join us

आफ्रिदीने भारताला दिल्या शुभेच्छा!

पाकिस्तानचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतानाच दोन्ही देशांना शांती आणि सहनशीलतेसह पुढील वाटचाल करण्याचे आवाहन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 03:54 IST

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतानाच दोन्ही देशांना शांती आणि सहनशीलतेसह पुढील वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.सोशल मीडियाद्वारे आफ्रिदीने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या टिष्ट्वटर पेजवर संदेश लिहिताना आफ्रिदीने म्हटले की, ‘भारताला स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा. आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. त्यामुळे शांती, सहनशीलता आणि प्रेमाच्या दिशेने पुढे गेले पाहिजे. मानवता कायम राहिली पाहिजे.’ १५ आॅगस्टला भारताने आपला ७१वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. तसेच, त्याआधी १४ आॅगस्टला पाकिस्तानने स्वातंत्र्य दिन साजरा केला. नुकताच भारताचा कर्णधार विराट कोहलीने आफ्रिदीच्या सामाजिक संस्थेसाठी एक बॅट भेट दिली. यासाठी आफ्रिदीने आभारही मानले होते. तसेच, एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आफ्रिदीला भारतीय खेळाडूंनी स्वत:ची स्वाक्षरी केलेला एक टी-शर्ट भेट म्हणून दिला होता. (वृत्तसंस्था)