Join us  

Bad News : माझं घरच तू होतीस गं... आईच्या निधनानंतर SRHच्या क्रिकेटपटूला दुःख अनावर

क्रीडा विश्वातून व्यक्त होतेय हळहळ..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:08 AM

Open in App

अफगाणिस्तान संघाचा स्टार खेळाडू रशीद खान याच्या आईचे गुरुवारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) रशीद हा सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यानं आईच्या निधनाची बातमी ट्विट करून दिली. त्याच्या या ट्विटनंतर क्रीडा विश्वातून त्याच्या आईला श्रंद्धांजली वाहिली जात आहे. अफगाणिस्तानच्या या फिरकीपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. जागतिक क्रमवारीतही त्यानं दिग्गज गोलंदाजांना टक्कर दिली आहे. 

21 वर्षीय खेळाडूनं ट्विट केलं की,''माझं घरचं तू होतीस, आई. आता मला घरचं राहिलं नाही. तू हे जग सोडून गेलीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. तुझी आठवण नेहमी सोबत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली.''  जगभरातील चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 2018मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा तो ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग खेळत होता. वडिलांचे अंत्यसंस्कार करून तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतला, तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रशीदच्या खांद्यावर अफगाणिस्तान वन डे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानं 4 कसोटी, 71 वन डे आणि 48 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 23, 133 आणि 89 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्यानं 46 सामन्यांत 55 विकेट्स घेतले.  

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादआयपीएल