Join us  

अफगाणिस्तान व आयर्लंडला वेळ द्यायला हवा

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जे काही घडले ते आश्चर्यचकित करणारे नक्कीच नव्हते, पण भारत-अफगाणिस्तान लढत केवळ दोन दिवसामध्ये संपेल, याची अनेकांना अपेक्षा नव्हती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:45 AM

Open in App

- सौरव गांगुली लिहितात...चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जे काही घडले ते आश्चर्यचकित करणारे नक्कीच नव्हते, पण भारत-अफगाणिस्तान लढत केवळ दोन दिवसामध्ये संपेल, याची अनेकांना अपेक्षा नव्हती. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी कसोटी सामना किती दिवस चालला, याची अजिबात चिंता करायला नको. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काय करायला हवे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. हे अन्य कुठल्याही दिवशी घडले असते. श्रीलंका, बांगलादेश व झिम्बाब्वे या संघांनी ज्यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यावेळी त्यांचे सुरुवातीचे सामने कमी वेळेतच संपले होते. काळानुरुप या संघांनी प्रगती केली. अफगाणिस्तानसोबतच (कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा) आयर्लंड या संघांना कसोटी क्रिकेटमध्ये काय आवश्यक आहे, हे समजून घेण्यास वेळ देणे आवश्यक आहे. काळानुरुप ते शिकत जातील.पाकिस्तानविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत आयर्लंड संघाला मोठा आत्मविश्वास मिळाला असेल आणि सध्या अफगाणिस्तान संघानेही आत्मविश्वास बाळगायला हवा. जर आयर्लंड करू शकतो तर आम्हीही करू शकतो, हे त्यांनी समजून घ्यायला हवे. विश्व क्रिकेटला दर्जेदार संघांची गरज असून एक्सपोजरमुळे ते चांगले होऊ शकतात.अफगाण संघ सध्या टी-२० मोडमध्ये असल्याचे दिसून येते. ज्यावेळी ते वेगवान गोलंदाजांना खेळत होते त्यावेळी त्यांच्या पायाच्या हालचाली होत नसल्याचे दिसून आले. उमेश यादवने चांगल्या वेगाने मारा केला आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या मनात साशंकता निर्माण केली. संयम आणि योग्य फटक्यांची निवड याचे नाव कसोटी क्रिकेट आहे. अचूक फटका, उजव्या यष्टिबाहेरच्या चेंडूबाबत अचूक निर्णय आणि चेंडू वेल लेफ्ट करणे यशात महत्त्वाचे ठरते. काळानुरुप आणि योग्य प्रशिक्षणानंतर त्यांना हे शिकता येईल.कसोटी क्रिकेटमध्ये निर्धाव षटके टाकून फलंदाजी करणाऱ्या संघावर दडपण निर्माण करता येते, विशेषत:, फलंदाज तर पुढे सरसावत खेळत नसेल तर. टी-२० क्रिकेटमध्ये याची प्रचिती येते. भारताने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. शिखर धवन व मुरली विजय यांनी खोºयाने धावा वसूल केल्या. हार्दिक पांड्यानेही चांगली कामगिरी केली. सर्व गोलंदाजांनी आपली छाप सोडली. उमेश व ईशांत यांना वेगवान गोलंदाजी करताना बघून चांगले वाटले.ईशांत प्रतिष्ठेच्या लढतींमध्येही अशाच प्रकारच्या लेंथ-लाईनने गोलंदाजी करेल, अशी आशा आहे. रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकी माºयाने अफगाणच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाºया गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान पटकावण्यासाठी त्याचे अभिनंदन. भारतीय संघाने शानदार कामगिरी केली असून आता आमचे लक्ष इंग्लंड दौºयावर केंद्रित झाले आहे. (गेमप्लॅन)

टॅग्स :सौरभ गांगुली