Join us  

आकड्यांनुसार रोहितच पुल शॉटचा बादशाह; पुलशॉटवर सर्वाधिक धावा, ११६ षटकार लगावले

जर २०१५ नंतरच्या आकड्यांकडे पाहिले तर रोहितने सर्वाधिक धावा या पुलशॉटवर केल्या आहेत. यात पुल शॉटवर केलेल्या धावांवरदेखील रोहित इतर फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 2:33 AM

Open in App

नवी दिल्ली : रोहित शर्माने काही दिवस आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुल शॉट खेळणाऱ्या चार फलंदाजांच्या यादीत स्वत:ला न समाविष्ट करण्याच्या निर्णयावर चांगलाच टोमणा मारला होता. जर आकड्यांकडे पाहिले तर हे सिद्ध होते की, क्रिकेटचा हा शॉट खेळण्यात रोहित शर्माच्या तोडीचा कुणीच नाही.जर २०१५ नंतरच्या आकड्यांकडे पाहिले तर रोहितने सर्वाधिक धावा या पुलशॉटवर केल्या आहेत. यात पुल शॉटवर केलेल्या धावांवरदेखील रोहित इतर फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे.एका वेबसाईटने याबाबत लिहले की, शर्माने २०१५ पासून पुल शॉटवर १५६७ धावा केल्या आहेत. आणि या प्रारुपात तो या शॉटने सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचा या शॉटचा स्ट्राईक रेट २७४.९१ आहे. पुल शॉट खेळून ५०० पेक्षा जास्त धावा करणारा तो सर्वोत्तम फलंदाज आहे.’रोहितने २०१५ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुलने १५६७, फ्लिकने १२२९ आणि कव्हर ड्राईव्हने ११०५ धावा केल्या. रोहितने १७.४७ टक्के धावा पुल शॉटने केल्या. रोहितने पुल शॉटने ११६ षटकार लगावल्या. त्यानंतर इयोन मॉर्गनचा नंबर आहे. त्याने या वर्षात पुल करून ४७ षटकार लगावले. भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज असलेल्या रोहित शर्माने पुल शॉटनंतर फ्लिक, कव्हर ड्राईव्हचा उपयोग केला आहे.गेल्या पाच वर्षात पुल शॉटने सर्वाधिक धावा करणाºया फलंदाजांमध्ये रोहितने डेव्हिड वॉर्नर (१२०९) ,शिखर धवन(८७९), बेन स्टोंक्स (८४८) आणि कुसाल मेंडिस (७५२) यांचा नंबर आहे.गमतीची बाब अशी या पैकी एकाही फलंदाजाचे नाव आयसीसीच्या यादीत नाही.आयसीसीचे अनेक कर्मचारी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे घरूनच काम करत आहेत. त्यावर देखील रोहितने मजेशीर टिष्ट्वट करत त्यांची फिरकी घेतली होती.आयसीसीच्या पोस्टवर रोहितचा ‘पुल शॉट’आयसीसीने वेस्ट इंडिज्च्या व्हिव रिचर्डस्, आॅस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांचे फोटो टिष्ट्वट केले होते. त्यात यांच्यापैकी पुल शॉट खेळण्यात कोण सर्वोत्तम आहे, असा प्रश्नही केला होता. त्यावर रोहित शर्माने यात कुणाचीतरी कमी आहे. मला वाटते की घरुन काम करणे इतके सोपे नाही.’ सध्याच्या काळात पुलशॉटचा सर्वोत्तम आणि प्रभावी उपयोग करणाºया फलंदाजांपैकी एक अशी रोहितची ओळख आहे.

टॅग्स :रोहित शर्मा