Abu Dhabi T10: ६,६,६,६,६,४,४,४;  मोईन अलीनं ८ चेंडूंत कुटल्या ४२ धावा, ६ षटकांत संघासाठी उभारल्या १०६ धावा

Abu Dhabi T10:  मोईन अली आणि केनार लुईस यांच्या फटकेबाजीच्या जोरावर नॉर्दर्न वॉरियर्स संघानं टी१० लिगमध्ये चेन्नई ब्रेव्ह्स संघाला पराभूत केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 12:25 PM2021-11-25T12:25:09+5:302021-11-25T12:25:25+5:30

whatsapp join usJoin us
Abu Dhabi T10: Moeen Ali, Kennar Lewis help Northern Warriors register first win of tournament | Abu Dhabi T10: ६,६,६,६,६,४,४,४;  मोईन अलीनं ८ चेंडूंत कुटल्या ४२ धावा, ६ षटकांत संघासाठी उभारल्या १०६ धावा

Abu Dhabi T10: ६,६,६,६,६,४,४,४;  मोईन अलीनं ८ चेंडूंत कुटल्या ४२ धावा, ६ षटकांत संघासाठी उभारल्या १०६ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Abu Dhabi T10:  मोईन अली आणि केनार लुईस यांच्या फटकेबाजीच्या जोरावर नॉर्दर्न वॉरियर्स संघानं टी१० लिगमध्ये चेन्नई ब्रेव्ह्स संघाला पराभूत केलं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या मोईन अलीनं ८ चेंडूंत ४२ धावांचा पाऊस पाडला.   अली व लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी  १०६ धावांची भागीदारी केली.  ओशाने थॉमसनं या सामन्यात हॅटट्रिक घेत वॉरियर्सच्या विजयात हातभार लावला आणि १९ धावांनी चेन्नईला हार मानण्यास भाग पाडले. या स्पर्धेतील वॉरियर्सचा हा पहिलाच विजय ठरला. 

प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सनं ४ बाद १५२ धावा उभ्या केल्या. लुईस  व अली यांनी पहिल्या विकेटसाठी ६.१ षटकांत १०६ धावा जोडल्या. लुईस १९ चेंडूंत ६ चौकार व  ३ षटकारांसह ४९ धावांवर माघारी परतला, तर अलीनंही १९ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ४९ धावा केल्या.  त्यानंतर कर्णधार रोव्हमन पॉवेलनं १२ चेंडूंत २८ व समित पटेलनं १७ धावा करताना संघाला ४ बाद १५२ धावा उभारून दिल्या. कर्टीस कॅम्फेर व मार्क डेयाल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात चेन्नईचा संपूर्ण संघ ९.५ षटकांत १३३ धावांवर माघारी परतला. ओशाने थॉमसनं ७व्या षटकात मार्क डेयाल,  टिओन वेबस्टर व कर्टीस कॅम्फेर यांना सलग तीन चेंडूंत माघारी पाठवून हॅटट्रिक पूर्ण केली. चेन्नईकडून रवी बोपारा ( ३०) व भानुका राजपक्षा ( ३४) यांनी चांगला खेळ केला. जोश लिटल व उमैर अली यांनी प्रत्येकी दोन विकेट्स  घेतल्या. 

Web Title: Abu Dhabi T10: Moeen Ali, Kennar Lewis help Northern Warriors register first win of tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.