Join us  

शाहिद आफ्रिदीची मोठी घोषणा; इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला देणार 'सहारा'!

इंग्लंड दौऱ्यावर स्पॉन्सर्स लोगो शिवाय खेळावं लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 12:36 PM

Open in App
ठळक मुद्देतीन कसोटी, तीन ट्वेंटी-20 सामन्यांसाठी पाकिस्तान संघ इंग्लंडमध्ये दाखलइंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या संघाला स्पॉन्सर्स मिळत नाही

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला ( पीसीबी) मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्पर्धांसाठी त्यांना स्पॉन्सर्स मिळेनासे झाले आहे. यात पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचा संघ तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पण, या दौऱ्यावर त्यांना स्पॉन्सर्स मिळत नाही. त्यांच्या जुन्या स्पॉन्सर्ससोबतचा करार संपुष्टात आला आहे. आता त्यांना इंग्लंड दौऱ्यावर स्पॉन्सर्स लोगो शिवाय खेळावं लागणार आहे. पण, आता त्यांना शाहिद आफ्रिदी फाऊंडेशननं 'सहारा' देण्याची तयारी दर्शवली आहे. आफ्रिदीनं तशी घोषणा केली आहे. 

बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर  बंदूक ठेवून केली शिकार!

पाकिस्तानचा संघ तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. पण, त्यांच्या जर्सीवर कोणत्याही स्पॉन्सर्सचा लोगो दिसत नाही. आधीच्या स्पॉन्सर्ससोबतचा करार केव्हाच संपुष्टात आला आहे आणि त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंच्या ट्रेनिंग किटवर एकच लोगो दिसत आहे. एका कंपनीनं लावलेल्या बोलीची किंमत ही पीसीबीच्या जून्या स्पॉन्सर्सच्या रकमेतील 30 टक्केच रक्कम भरून काढत आहे.  

वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम

कोरोना व्हायरसमुळे कोणी स्पॉन्सर्स पुढे येत नसल्याचे पीसीबीच्या मार्केटींग विभागानं सांगितले. याशिवाय पीसीबीला स्थानिक क्रिकेट स्पर्धांसाठीही स्पॉन्सर शोधण्यात अडचण येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांना आणखी स्पॉन्सर्स मिळण्याची त्यांना आशा आहे. स्पॉन्सर्सशीपमधून खेळाडूंनाही रक्कम मिळते.  कसोटी सामन्यासाठी 4 लाख 50 हजार आणि वन डे व ट्वेंटी-20 साठी 2 लाख 25 हजार खेळाडूंना दिले जातात. पण, आता तेही मिळणार नाही. 

''पाकिस्तान क्रिकेट संघाच्या किटवर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो पाहायला आम्हाला आवडेल. आम्ही पीसीबीचे चॅरीटी पार्टनर आहोत. वसीम खान आणि पीसीबीकडून मिळणाऱ्या पाठींब्याचे मी आभार मानतो आणि या दौऱ्यासाठी संघातील खेळाडूला शुभेच्छा,''असे आफ्रिदीनं ट्विट केलं.  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तानइंग्लंड